भारतीय जनता पार्टी लांजा तालुक्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी (ह्रषिकेश सावंत) लांजा तालुका भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात ७८ जणांचा समावेश करण्यात आला आहे.ही कार्यकारीणी आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी निवडण्यात आली.
लांजा तालुका भाजपाच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाच्या नवीन कार्यकारिणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते.त्यानुसार आज बुधवारी पार पडलेल्या बैठकीत नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.याबाबत भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकारिणी निवडीची माहीती देण्यात आली.
नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – उपाध्यक्षपदी श्री परशुराम रसाळ,श्री अजय गुरव,श्री चंद्रकांत मांडवकर,श्री पंढरीनाथ धनावडे,श्री अनिल पन्हळेकर,श्री आत्माराम धुमक,श्री गणपत घडशी,श्री जयवंत दाभोळकर,श्री वासुदेव राणे,श्री अंकुश कांबळे,श्री सोनिया गांधी यांची तर सरचिटणीस म्हणून श्री शिवराज हरमले,तर चिटणीस श्री यशवंत कवचे,जितेंद्र चव्हाण,अनंत चौगुले,कृष्णा आगरे,सुरेंद्र खामकर,श्री शिवाजी पराडकर,वैभव वारिशे,गणेश इंदुलकर,आत्माराम करंबळे,अनंत रायकर,अथर्व हर्डिकर,संतोष पांचाळ,शारदा गुरव,चंद्रकांत भुवड यांची निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर यांच्यासह तालुका प्रभारी श्री वसंत घडशी,जिल्हा सरचिटणीस श्री यशवंत वाकडे,श्री मनोहर भिडे, श्री खानविलकर,माजी उप नगराध्यक्ष श्री रविंद्र कांबळे, श्री अशोक गुरव, श्री चंद्रकांत मांडवकर,प्रविण सुर्वे,कृष्णा आग्रे,नागेश चौगुले आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा