रत्नागिरी जिल्हा प्रभारी उदय जवके यांचे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे स्वागत


रत्नागिरी (हृषिकेश सावंत):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसची  रत्नागिरी जिल्ह्यात मजबूत बांधणी व्हावी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या अनेक योजनांच्या  माध्यमातून प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देऊन त्याला स्वय.म रोजगाराच्या माध्यमातून उभे कसे करता येईल आणि गाव तिथे राष्ट्रवादी हि संकल्पना राबवत राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकद जिल्ह्यात कशी वाढेल यासाठी चिपळूण येथे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला जिल्हा प्रभारी श्री उदय जवके आले असता त्यांचे स्वागत राष्ट्रवादी युवक चे प्रदेश सरचिटणीस श्री अजय बिरवटकर, प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू प्रदेश सरचिटणीस  डॉ चाळके, युवक जिल्हाध्यक्ष श्री योगेश शिर्के, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर,लांजा तालुकाध्यक्ष बाबा धावणे,मा.आमदार श्री शेखर निकम सर यांचे स्वीय सहाय्यक श्री अमित, लांजा युवक चे योगेश राजेशिर्के, पप्पु तोडणकर,रुपेश आडिवरेकर यांच्या कडुन करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते



टिप्पण्या