महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,ठाणे शहर (जिल्हा) संघटनेच्यावतीने पत्रकारांना स्वतंत्र कोविड सेंटर आणि तात्काळ ५० लाखांचा विमा संरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर च्यावतिने कोरोना संसर्गामध्ये तातडीने रुग्ण बेड उपलब्ध करुन देणे आणि एखादा पत्रकार दगावल्यास त्यांच्या कुटूंबियांना ५० लाखांचा तातडीने विमा सरक्षण मिळण्यासाठी आज नाममात्र  सभासदांच्या उपस्थितीत तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले.


गेले कित्येक दिवस कोरोनाशी दोन हात करताना पत्रकारांची कोणतीही दक्षता घेतली जात नाही.यासाठी आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे शहर (जिल्हा) च्या सर्व सभासदांनी  आज मंगळवार दि.२९ सप्टेंबर २०२० रोजी मा. श्री राजेश नार्वेकर ठाणे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्रकारांच्या विविध/ समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे ठाण्यातील पत्रकारही आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे अशा परिस्थितीत एखाद्या पत्रकार बांधवांना कोरोना संसर्ग झाला तर ते परवडणारे नाही.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्रकार बांधवांसाठी  कोविड सेंटरमध्ये विशेष राखीव अलगीकरण आणि मोफत उपचार,तसेच संसर्गामुळे दगावल्यास त्यांच्या कुटूंबियांना ५० लाखांचा तातडीने विमा सरक्षण मिळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्यसंघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाने निवेदन देण्यात आले


  त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ( ठाणे जिल्हा शहर ) अध्यक्ष श्री. नितिन मनोहर शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष विकास पाटील, सचिव संजय दळवी, शहर संर्पक प्रमुख मिलिंद दाभोळकर, शहर संर्पक प्रमुख सतिशकुमार भावे, वृत्तवाहीनी प्रमुखव संतोष पडवळ, सहसचिव ज्योती चिंदरकर, सहसचिव प्रमोद घोलप, सहसचिव सचिन ठीक, संघटक शिवाजी कोळी, सहसल्लागार राजन पाटील, प्रसिध्दी प्रमुख सुबोध कांबळे, प्रसिध्दी प्रमुख देवेंद्र शिंदे, कार्य. सदस्य राहुल आहिरे उपस्थित होते.


टिप्पण्या