कोकण विभाग शिक्षक आमदार  बाळाराम पाटील यांचा शिक्षक हिताय कामांचा धडाका सुरूच


कोविड -१९ प्रतिबंधित अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान विलंब न करता तात्काळ मंजूर करण्यासाठी घेतली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट


मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) राज्यात कोविड-१९ चा प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांना ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत.सदर शिक्षक हे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे करीत आहेत. ड्युटीवर असताना मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याने अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व प्राधान्य क्रमाने कोरोनावर उपचारासाठी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु शिक्षण विभागात या उलट चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा इतर विभागांप्रमाणे अशीच सोय तात्काळ करणे आवश्यक असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.


        राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना ड्युटीवर असताना कोरोना बाधित झाले आणि उपचार घेत असताना पुरेशा सोई सुविधा न मिळाल्याने शेवटी मृत्यु पावल्याचे निदर्शनास येत आहे. तरी राष्ट्रीय कर्तव्य करत असताना मृत्यू पावलेल्या उपरोक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या वारसांना विलंब न करता रु ५० लक्ष तात्काळ मिळतील अशी सोय करण्याची मागणी कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील व आमदार  दत्तात्रय सावंत आमदार, श्रीकांत देशपांडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केलेली आहे. आपली मागणी रास्त असून सदर बाबत लवकरच योग्य तो निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी  राजेश टोपे यांनी दिल्याचे आमदार श्री. बाळाराम पाटील यांनी सांगितले.तसेच अनुदानासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमिती सदस्य मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन लवकरात लवकर अनुदान वितरित करण्याची विनंती आमदार बाळाराम पाटील , आमदार दत्तात्रय सावंत व आमदार श्रीकांत देशपांडे यांनी या भेटी दरम्यान केली.


टिप्पण्या