गाव विकास समिती मार्फत छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
प्रथम तीन क्रमांकासह २० उत्तेजनार्थ बक्षिसे
मुंबई(शांत्ताराम गुडेकर) गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा व ग्रामीण विद्यार्थी संघटना यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना:आजार,बाजार आणि लोकशाही असा विषय या निबंध स्पर्धेसाठी देण्यात आला असून कोरोना काळात संकटात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या,लोकशाही अधिकारांचा झालेला संकोच या विषयांवर तरुणाईने बोलते व्हावे म्हणून हा विषय निबंध स्पर्धेसाठी निवडण्यात आला असे गाव विकास समितीच्या महिला संघटना अध्यक्षा सौ.दिक्षा खंडागळे गीते यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा गाव विकास समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाते.संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड,उपाध्यक्ष राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले जात असताना निबंधाच्या माध्यमातून तरुणांना बोलके करून अनेक समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम यानिमित्ताने केले जाते.
सदर स्पर्धा २५ वयोमर्यादे पर्यंत खुल्या गटात घेतली जाणार आहे.कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय व पदव्युत्तर पदवी चे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. निबंध साठी एक हजार ते बाराशे शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक-रुपये-५५५५/-आणि सन्मानचिन्ह
,द्वितीय पारितोषिक-रुपये-३३३३/-आणि सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक रुपये २२२२/-
आणि सन्मानचिन्ह,याशिवाय २० उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत.निबंध पाठविण्याचा पत्ता-सौ.दिक्षा खंडागळे-गीते यांचे निवासस्थान
देवरुख कॉलेजच्या मागे,केशवश्रुष्टी रोड,देवरुख,तालुका-संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी असा आहे.अधिक माहितीसाठी मो.९४०४१५८३८४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा