पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सैतवडे येथील युवकांना मत्स्य व्यवसायासाठी मच्छी जाळी प्रदान


रत्नागिरी (हृषिकेश सावंत):- मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे कार्यक्रम जोमाने सुरू असताना आज मोदींजींच्या वाढदिनी मुस्लिम बांधव झुल्फिकार डिंगणकर, सलीम चिकटे, मुजम्मिल दळवी यांना भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी रुपये चाळीस हजार किमतीची मत्स्य जाळी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रदान केली.
      नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिनी मुस्लिम समाजातील या युवकांना व्यवसायासाठी नवे मार्ग उपलब्ध करून देता आले याचे समाधान वाटते असे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले.  सलीम चिकटे यापुढे मोदींजींच्या राष्ट्रप्रेमी विचारधारेबरोबर मार्गक्रमण करून भाजपा गावोगावी पोहोचण्यासाठी काम करू असे म्हणाले.
     दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात वृक्षारोपण, रक्तदान, फळवाटप असे विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
भा.ज.पा. कार्यालयात मोदिजींच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्यकर्तुत्वाचे पैलू उलगडणारी सचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजेश सावंत, सचिन करमरकर, नित्यानंद दळवी, बाबू सुर्वे आदि पदाधिकारी उपस्थित होते.


 


टिप्पण्या