मनसे आमदार श्री प्रमोद (राजू) पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त दिव्यातील प्रवाश्यांना तात्पुरत्या निवारा शेडचे उद्घाटन संपन्न
ठाणे (दबाववृत्त) मनसे आमदार श्री प्रमोद (राजू) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यातील मनसैनिकांनी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या प्रवाशी निवारा शेडचे उद्घाटन आज दिवा चौकात करण्यात आले.
यावेळी दिवा मनसे अध्यक्ष श्री तुषार पाटील, प्रभाग अध्यक्ष श्री तेजस पोरजी, श्री समीर पाटील,दिवा उपविभागीय अध्यक्ष श्री प्रशांत गावडे आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेले कित्येक दिवस लाकडाऊन सुरु असल्याने आणि रेल्वेचा प्रवास करण्यास बंदी असल्याने दिव्यातील अनेक नागरिकांना बसने प्रवास करावा लागत आहे.बस पकडण्यासाठी येथील प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहून बसची वाट पहावी लागत आहे.यावेळी उन्हाच्या झळा आणि पावसाळ्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दिव्यात प्रवाशांसाठी अशी अजूनही कोणती सुविधा निर्माण न झाल्याने मोठी पंचायत झाली होती. मात्र या नागरिकांचे दिवसेंदिवस होणारे हाल लक्षात घेवून येथील स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून तात्पुरत्या स्वरुपात प्रवाशी निवारा शेडची उभारणी केली आहे.यामुळे उन्ह आणि पाऊस यांची थोडी कमी झळ सोसावी लागणार आहे.ही शेड तात्पुरत्या स्वरुपात असून भविष्यात येथील नागरिकांना कायमस्वरुपी शेडची व्यवस्था होणे गरजेचे आहे. अशी मागणी ठाणे महानरपालिकेकडे करण्यात येत आहे.
उन्हाच्या झळा सोसून आणि तानसात रांगेत उभे राहून मनसेच्या कार्यकत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात का होईन सामाजिक भान ठेवून निवारा शेडची सोय केल्याबद्दल दिव्यातील नागरिकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. काहींनी आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा