जात पडताळणी समितीकडून वेळेत प्रमाणपत्र मिळण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांचे लक्ष वेधले


मुंबई  - कुर्ला विधानसभेचे अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडून आलेले आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुंबई उपनगर जात पडताळणी समितीकडून रक्त नात्यातील नातेवाईकांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी दिनांक २४|११|२०१७ च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अधिसूचनेचा संदर्भ देत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विद्यार्थ्यांना वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पत्राव्दारे लक्ष वेधले आहे.मुंबई उपनगर जात पडताळणी समितीकडे दिनांक ४|२|२०२० रोजी मुलीचा अर्ज दाखल करून पडताळणी प्रमाणपत्राच्या प्रतिक्षेत असलेले  विनोद साडविलकर यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या निदर्शनास आणले होते.त्यांना अलिकडेच मुलीचे जात प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.  महाराष्ट्रातील जिल्हा निहाय असलेल्या जाती प्रमाणपत्र          पडताळणी समित्यांकडून प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन वेळेत दाखला मिळाण्यासाठी आदेश निर्गमित करण्याची मागणी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.


टिप्पण्या