मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने रायगडावर शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  २४ सप्टेंबर १६७४ ह्या दिवशी छ्त्रपती शिवाजी महाराजांनी ६ जुन १६७४ ला झालेला पहिला वैदिक राज्याभिषेक धुडकावत दुसरा राज्याभिषेक शाक्त/तांत्रिक पद्धतीने निश्चलपुरी गोसावी ह्यांच्या हातुन करवून घेतला . ही खुप मोठी युगांतकारी घटना आहे . ह्या माध्यमातुन महाराजांनी असमानतेचा , गुलामीचा आणि पारतंत्र्याचा अशा वैदिक धर्मास फाटा देत जात्यांतक समाजव्यवस्थेचा पाया रचला. तसेच २४ सप्टेम्बर १८७३ याच दिवशी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करत आधुनिक भारतात वैदिक ब्राह्मणी धर्माला सुरुंग लावला .
       म्हणून इतिहासाला न विसरता इतिहासाचा जागर करण्याची आणि खरा इतिहास घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ने हाती घेतली आहे. गेली कित्येक वर्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड २४ सप्टेंबर हा दिवस अत्यंत उत्साहात किल्ले रायगड या ठिकाणी साजरा करते. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय #प्रवीणदादागायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय  शाक्तशिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चे कोकण अध्यक्ष शिवश्री #सचिनजगदीशसावंतदेसाई यांच्या संकल्पनेतून सर्वप्रथम हा शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा , दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे मुख्य प्रवर्तक शेख सुभान अली यांच्या पहिल्या कार्यक्रमाने झाला. असे अनेक उपक्रम राबवत प्रतिवर्षी हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहाने आम्ही साजरा करत असतो याच राज्याभिषेक सोहळ्या दुसऱ्या वर्षी आ.#आदितीतटकरे यांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तिसऱ्या वर्षी शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी सर यांच्या उपस्थितीत सर्व गोसावी समाज रायगडावर एकवटून निश्चलपुरी गोसावी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
      परंतु यावर्षी कोरोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडतो की नाही या विवंचनेत होतो कारण या सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या रायगड जिल्हाधिकारी तसेच पुरातत्त्व खात्याची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरणार होती.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देताच त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला 20 कार्यकर्ते घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्याची परवानगी मिळाली.
सर्व कार्यकर्त्यांनी तन, मन आणि धन देऊन हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला.
       या कार्यक्रमाप्रसंगी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष शिवश्री स्वप्नील म्हात्रे रायगडचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष शिवश्री भूषण राजाराम शिसोदे संभाजी ब्रिगेड नवी मुंबई चे जिल्हाध्यक्ष शिवश्री सुभाष सावंत, ठाणा जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पाटील, रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री समीर म्हात्रे उरण चे तालुकाध्यक्ष जितेश पाटील चेतन मुंडकर, केतन, दीपक राजपूत, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या