अंधेरी येथील पोलीस विभागात पोलिसांनी केले ५० डबेवाल्यांच्या कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) अंधेरी पोलीस विभाग येथे शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी अंधेरीतील ५० डबेवाले यांच्या कुटूंबाना अंधेरी पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू म्हणजेच गहू, तांदूळ, कुळीथ, साखर, तेल, तूर डाळ, मीठ आणि पोहे इत्यादींचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमात एस. एन. डी. टी. च्या डायरेक्टर ऑफ लाईफलाॅग लरनिंग अँन्ड एक्टेन्शन व हेड ऑफ सोशल वर्क डाॅ. आशा पाटील, निवृत न्यायाधिश सौ. कल्पना होरे, अंधेरी पोलीस विभागाचे आदरणीय सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश देसाई, नाकोडा ज्वेलर्सचे लोकेशभाई तसेच जात पडताळणी ऑफिस दक्षता पथक मुंबई शहरचे पोलीस उपअधीक्षक सुनिता नाशिककर आणि पोलीस निरीक्षक हणीप मुलाणी यांची हजेरी लागली. अंधेरीचे पोलीस हवालदार दत्तात्रय सानप व इतर सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य या कार्याला लाभले. अंधेरीतील संवेदनाक्षम नागरिक प्रदिप छेडा यांची सुद्धा या उपक्रमाला मोलाची मदत लाभली.यापूर्वी देखिल कल्याण येथील तृतीय पंथीयांना तसेच नेवासा येथील वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. करोनाच्या युद्धजन्य संवेदनशील परिस्थितीत रोजंदारीवरील वर्गा बरोबरच इतर छोट्या - मोठ्या व्यवसाय करणारे लोक सुध्दा संकटात आहेत. त्यामुळे सर्व नोकरदार वर्गाने सामाजिक बांधिलकी म्हणून फुल नाही फुलाची पाकळीची मदत गरजू पर्यंत पोहचवावी असे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पण्या