ठाण्यातील शिवसेना गटनेत्याच्या वाहनावर हल्ला,चालकास मारहाण
ठाणे (प्रतिनिधी) ठाणे महापाालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या वाहनावर मोटारसाकलवरुन आलेल्या दारुच्या नशेतील तिघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.या घटनेत बारटक्के यांचे वाहन चालक दिपक परब यांनाही त्यांनी मारहान केली.या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तिघांविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ सप्टेंबर रोजी रात्री 8.30 ते 8.45 वाजण्याच्या सुमारास सावरकर नगर येथील रवीची माता सर्कलजवळून बारटक्के यांच्यासह ते आपल्या चारचाकी वाहनातून जात होते.त्याचवेळी मोटारसायकलवरुन तिघेजण आले.परब यांनी त्यांना मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितले.याचाच राग आल्याने त्यांनी बारटक्के यांच्या कारवर लाथा मारुन कारची मागची काचही फोडली.त्यानंतर परब यांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करीत दमदाटीही केली.यात त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले असून हल्यात परब यांना मार लागला आहे.शिवसेना उपविभागप्रमुख महेश लोखंडे,शाखाप्रमुख हितेंद्र लोटलीकर आणि विजय देवळेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत हा वाद सोडविला.दरम्यान वर्तकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कोणालाही अटक केली नसल्याचे पोलीसांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा