बामसेफ प्रणित छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने रायगडावर छत्रपती शिवरायांचा शाक्त पद्धतीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम किल्ले रायगड येथे छत्रपती क्रांती सेना,बामसेफ, भारत मुक्ति मोर्चा, बुध्दिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय किसान मोर्चा,मूलनिवासी महिला संघ,बी.एम.पी. भारतीय विद्यार्थी मोर्चा व इतर संघटनेच्या माध्यमातून संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी माननीय जिल्हा अधिकारी रायगड यांनी २० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती. त्यानुसार कोविड १९ संदर्भातील सर्व नियम पळून आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महारांचा पहिला राज्याभिषेक काशीचे गागा भट यांच्या माध्यमातून १६ जून रोजी संपन्न झाला होता यासाठी मोठया प्रमाणात स्वराज्याचे द्रव्य खर्ची पडले होते. तसेच या राज्याभिषेकावर जिजाऊ माॅ साहेब खुश नव्हत्या व इतर काही कारणाने छत्रपतींनी दुसरा राज्यभिषेक करण्याचे ठरवले. हा राज्याभिषेक निश्चल पुरी गोसावी यांच्या माध्यमातून करण्यात आला होता.
निश्चल पुरी गोसावी हे तत्कालीन बौद्ध धम्माची एक शाखा तंत्रयान या पद्धतीने करण्यात आला. मात्र हा राज्याभिषेक मनुवादी व्यवस्थेने समाजासमोर आणला नाही. वास्तविक पाहता पहिला राज्याभिषेक झाला असताना दुसरा राज्यभिषेक छत्रपतीनी का केला? यावर चर्चा व्हायला हवी होती परंतु शिवजयंतीचा तारीख व तिथीचा वाद सुरू झाल्याने हा मुद्दा दुर्लक्षित राहिला. मात्र छत्रपतीक्रांती सेना हा राज्यभिषेक दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज आहे. तसेच हा विषय समाजासमोर आणून या राज्याभिषेका विषयी समाजात जागृती करण्याचे काम केले जाणार आहे.
सदर कार्यक्रम ज्या निश्चलपुरी गोसावींच्या हस्ते पार पडला त्यांचे वंशज गोसावी महाराज व त्यांची टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती. पुढील वर्षी आपण हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करू व समाजात जागृती करू असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.हाटे साहेब महाड यांनी केले.आपल्या प्रस्ताविकात हाटे साहेब म्हणाले की, आज मराठा आरक्षण हा मुद्दा पेटलेला आहे. मात्र आमचा मराठा भाऊ आपला खरा इतिहास विसरला आहे. जर छत्रपती शाहू महाराजांचे आरक्षण समजून घेतले असते तर आज ही वेळच आली नसती. खरे तर मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी सर्व प्रथम बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांनी केली आहे. त्यामुळे छत्रपती क्रांती सेना मराठयांच्या आंदोलनात त्यांच्या बरोबर आहे. तसेच आज शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम त्यांच्या विरोधात तीन कायदे पास करून करण्यात येत आहे. त्यासाठी बामसेफ त्यांच्या सर्व अपशूट विंग राष्ट्रव्यापी जन आंदोलन करणार असून यामध्ये सर्व समाजाने एकत्र आले पाहिजे असे आवाहन सदर कार्यक्रमातून करण्यात आले. सदर कार्यक्रमास बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क रायगड जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत कासे सर, बामसेफ कोकण प्रभारी इंगळे सर, भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष विजय आवस्कर सर, संयोजक बहुजन क्रांती मोर्चा रायगड चे राम धरणे सर, राष्ट्रीय किसान मोर्चा रायगड चे प्रभारी गाडे सर, रायगड प्रोटॉन प्रभारी सचिन शिर्के, राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा मुंबई अध्यक्ष सुमित शिंदे, भारतीय विद्यार्थी मोर्चा कोकण प्रभारी संकेत कासारे, कासे मॅडम, एॅड. पवार, लामतुरे सर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण हाटे सर यांनी केले. तर सदर कार्यक्रमाला बंजारा समाज महाराष्ट्र उपाध्यक्ष आडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा