खानवली ग्रामपंचायतीच्यावतीने एकदिवसीय महिला बचतगट मार्गदर्शन शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद


लांजा (दिपक मांडवकर) लांजा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खानवली लावगणच्या वतीने आणि ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच माजी पंचायत समिती सदस्य श्री विश्वास दादा चौगुले यांच्या संकल्पनेतून प्रेरणा फाऊंडेशन सांगली यांना निमंत्रित करून एकदिवसीय महिला बचत गट प्रशिक्षण शिबीर उत्स्फुर्त वातावरणात संपन्न झाले.


  सेंद्रिय शेती , भाजीपाला , सेंद्रिय खतनिर्मिती यावर प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना इतर कोणते उद्योग करता येतील यावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी या चर्चासत्राला खानवली विद्यामंदिराचे सचिव शांताराम शेलार, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक खानविलकर, उपाध्यक्ष अनंत चौगुले, विवेक बोरकर , नित्यानंद बोरकर, प्रेरणा फाऊंडेशनचे संचालक सचिव सचिन यादव  (तज्ज्ञ प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य ) , पंढरीनाथ मेढे ( सेंद्रिय शेती तज्ज्ञ ), प्रतिमा टेकाळे, सूरज कुमार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नवलादेवी विद्या मंदिराचे सचिव शांताराम शेलार म्हणाले गावचे सरपंच विश्वास दादा चौगुले यांच्या संकल्पनेतून आजपर्यंत महिलांसाठी अनेक विविध उपक्रम राबविले गेलेत. अशेच उपक्रम भविष्यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने राबवून बचत गटाच्या महीलांबरोबरच गावातील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ यांना या अशा शिबिराचा लाभ व्हावा. कोरोनाचे सर्व नियम पाळत ग्रामपंचायतीच्या वतीने सुरक्षतेसाठी सोशल डीस्टन्स  पाळत सेनिटायझेर, मास्क आदींचा वापर करत हे शिबिर महिलांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद दळवी यांनी केले.


टिप्पण्या