फारूक अब्दुल्लांसारख्या फुटीरतावादी व देशविरोधी प्रवृत्तींना पोसणारी आपली व्यवस्थाच दोषी ! - श्री. सुशील पंडित, संस्थापक, रूट्स इन कश्मीर
चीनचे आधिपत्य स्वीकारण्याच्या फारूक अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर ‘ऑनलाईन विशेष परिसंवाद’
ठाणे - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फेरन्सचे खासदार डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्या काळात सहस्रो हिंदूंचा वंशविच्छेद झाला, चकमकीत ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना आली, काश्मिरमधील जनतेने भारतात रहावे कि नाही यावर जनमत घेण्याची मागणी झाली, तसेच म्यानमारमधील सहस्रो रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृपणे काश्मीरमध्ये वसवणे आदी अनेक फुटीरतावादी अन् देशविरोधी कृत्ये झालेली आहेत. अशा अब्दुल्ला यांच्या तोंडी काश्मिरी जनतेला चीनचे आधिपत्य स्वीकारण्याची भाषा आश्चर्यकारक नाही. अन्य देशात असे देशविरोधी वक्तव्य झाले असते, त्या व्यक्तीला तात्काळ देहदंडाची शिक्षा झाली असती. त्यामुळे खरा दोष आपल्या व्यवस्थेत आहे, जी अशा असंख्य देशविरोधी, फुटीरतावादी आणि आतंकवादी प्रवृत्तींना पोसण्याचे काम करते, असे परखड मत ‘रूट्स इन कश्मीर’चे संस्थापक तथा काश्मिरी अभ्यासक श्री. सुशील पंडित यांनी मांडले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदू राष्ट्र की’ या विशेष परिसंवाद मालिकेतील ‘क्या कश्मिरी मुसलमान चीन के गुलाम बनना चाहते है ?’ या ‘ऑनलाईन’ परीसंवादात ते बोलत होते. ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमांतून हा परिसंवाद 38768 हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 1 लाख 18309 हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, चीनमध्ये इस्लामला कोणतेही स्थान नाही. तेथे मुसलमानांवर अमानवीय अत्याचार, अनेक मशिदी पाडण्यापासून ते कुराण बदलण्यापर्यंत प्रकार चालू आहेत. त्याविषयी फारूक अब्दुल्ला यांना आक्षेप नाही; मात्र कलम 370 आणि 35 (अ) हटवल्यावर त्यांनी थेट चीनच्या अधिपत्याची भाषा करणे, याला ‘नॅशनल कॉन्फेरन्स’ नव्हे, तर ‘अॅन्टी नॅशनल कॉन्फेरन्स’ म्हणावे लागेल. वर्ष 1974 मध्ये ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’(जे.के.एल्.एफ्.) च्या आतंकवाद्यांसोबत असल्याचे फारूक अब्दुल्ला यांचे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहे. यातून त्यांची मानसिकता स्पष्ट होते. जे.के.एल्.एफ्.चे युवक बंदुक घेऊन देशावर आक्रमण करत आहे, तर त्यांना बळ देण्याचे काम अब्दुल्ला करत आहेत.
या वेळी ‘जम्मू इकजुट’चे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा म्हणाले की, फारूक अब्दुल्ला यांच्या वक्तव्याला जम्मू-काश्मीरमधील जनतेचा तीव्र विरोध आहे. आमच्या दृष्टीने फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फुटीरतावादी गिलानी, यासिन मलिक, तसेच जिहादी आतंकवादी आणि आयएस्आय हे सर्व एका माळेचे मणी आहेत. या लोकांना जम्मू-काश्मीर हिंदुविहीन करून केवळ इस्लामी राजवट आणायची आहे. त्यासाठी जिहाद पुकारला आहे. ही समस्या ओळखून त्यावर उपाय काढले गेले पाहिजे. काश्मीरी विचारक श्री. ललीत अम्बरदार म्हणाले की, अब्दुल्ला यांचे वक्तव्य हे 370 कलम हटवल्यामुळे झालेला मानसिक आजार आहे. त्याचबरोबर ‘काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार का झाला’ याचे उत्तर शोधले, तर काश्मीर हे हिंदू संस्कृतीचे प्रतिक असून त्यावर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे. काश्मीरविषयी जर आपण तडजोड केली, तर देशातील प्रत्येक ठिकाणी काश्मीरसारखी भयंकर परिस्थिती निर्माण होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा