विद्यार्थीनीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकास पोक्सो कायद्यांतर्गत अटक करा – आफ्रोहची पद्यश्री खासदार श्री विकास महात्मे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
ठाणे (प्रतिनिधी) आदर्श शिक्षक पुरस्कार मिळूनही हा पुरस्कार धुळीस मिळविणारा नागपुर येथील अंबाझरी शाळेतील शिक्षक आरोपी राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यास पोक्सो कायद्या अंतर्गत अटक करावी या मागणीसाठी आज पद्यश्री पुरस्कार विजेते खासदार श्री विकास महात्मे यांच्याकडे आॅर्गनायझेशन फाॅर राईट आॅफ ह्युमन या संघटनेच्यावतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.सबंधित शिक्षक हा या शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असल्याने या गुन्ह्याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार धुळीस मिळविणारा अंबाझरी नागपुर येथील आरोपी शिक्षक राजेंद्र दादाजी मसरकोल्हे यास शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सन 2018 मध्ये बडतर्फ करुन विभागीय चौकशी नेमण्यात आली होती.विभागीय चौकशीच्या अहवालात राजेंद्र हा दोषी आढळल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी १७ सप्टेंबर २०२० रोजी नागपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.त्यामुळे प्रशासन अशा आरोपीस जाणूनबूजून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे का असा संशय निर्माण झाला आहे.आरोपी राजेंद्र मसरकोल्हे व्यवसायाने शिक्षक असल्याने गुरु शिष्याच्या नात्याला त्याने काळीमा फासला आहे.त्यामुळे अशा शिक्षकाला अटक न केल्यास शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संशयास्पद बनू शकतो असे आफ्रोह संघटनेच्यावतीने म्हणने आहे.त्यामुळे अशा आरोपीस कोणतीही क्षमा न करता पोक्सो अंतर्गत अटक करुन कठोर शिक्षा द्यावी अन्यथा आफ्रोहतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.याप्रसंगी आॅफ्रोहचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जी.एम.निखारे,उपाध्यक्ष जयंत सांगळे, ठाणे जिल्हा सदस्य देवानंद सोनकुसरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा