पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यासोबत टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची टीम महाडमध्ये
महाड येथील दुर्घटनास्थळी टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाच्या पथकांना मार्गदर्शन करताना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे.
ठाणे ( प्रतिनिधी ) महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मदत कार्य वेगाने व्हावे यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे पोहोचले असून त्यांच्या सोबत ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
महाड दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. त्याचवेळी त्यांनी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांना ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके घटनास्थळी मदतकार्यासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. शिंदे यांच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेची टीडीआरफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके रवाना झाली. ही दोन्ही पथके आज सकाळी ७ वाजता दाखल होवून एनडीआरएफ टीमसोबत मदतकार्यास सुरूवात केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा