वेरळ ग्रामस्थ रहिवाशी संघाकडून गावात येणाऱ्या चाकरमान्यांचे थर्मल स्क्रिनिंग सर्व स्तरातून कौतूक


वेरळ येथे चाकरमानी आणि ग्रामस्थ यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याच्या तपासणी नाक्याचे उद्घाटन प्रसंगी पुणे मंडळाचे  सल्लागार सतीश डाकवे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय डा कवे, गावकर अनंत डाकवे व अन्य पदाधिकारी

 

लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील वेरळ गावातील पुणेस्थित वेरळ ग्रामस्थ रहिवासी संघ, पुणे शहर यांच्यावतीने गावात येणाऱ्या प्रत्येक चाकरमानी आणि ग्रामस्थांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याची व्यवस्था केल्याने तालुका भरातून कौतुकाची थाप पडत आहे.

           कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवेशाबाबत सुरुवातीला सर्वत्र नाराजी पसरली होती. पण ही नाराजी   दूर होणे गरजेचे होते.ही नाराजी मंडळाने दूर करून आम्हीसुद्धा गावचे असल्याचे दाखवून दिले आहे. गाव आपला आहे, या भावनेतून गावात येणाऱ्या प्रत्येक चाकरमानी, ग्रामस्थ अथवा अन्य कोणी यांना वेरल  गावच्या प्रवेशद्वाराजवळ थांबवून वेरळ ग्रामस्थ रहिवाशी संघाच्यावतीने थर्मल स्क्रीनिंग केले जाते.गावात येणार्य़ांची  नोंदणी करून त्यांना गावात प्रवेश  करून दिला जात आहे. वेरळ गावात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी गावात प्रवेश करतानाच हा तपासणी नाका सुरू केला आहे.  ही तपासणी गणेश विसर्जन होईपर्यंत सुरू राहणार आहे.  या तपासणी नाक्याचे उद्घाटन  वेरळ ग्रामस्थ रहिवाशी संघ पुणे शहराचे सल्लागार सतीश  डाकवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  विराज डाकवे, संभाजी पातेरे, गावकर अनंत डाकवे ,माजी शाखाप्रमुख काशिनाथ जाधव, मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय डाकवे, उदय जाधव आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या