कोरोनामुळे गणशोत्सवात जाखडी नृत्य करणाऱ्यांना आर्थिक फटका
रत्नागिरी (हृषिकेश विश्वनाथ सावंत) कोकणात गणेशोत्सवाला सुरूवात झाली. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या उत्सवाला सालाबादप्रमाणे उत्साह नाही हे दिसुन येते आहे.राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी केलेले नियम व अटी असल्याने या गणेशोत्सवाच्या आनंदावर काळोख पडला आहे. या उत्सवामध्ये प्रसिध्द असलेला पारंपारिक असलेले व सर्वांच्या आवडीचे असलेले जाखडी नृत्य होणार नाही. कारण ग्रामपंचायतीनी जाहीर केलेल्या सूचना पत्रात गणेश चतुर्थीमध्ये भजनी मंडळ व नाच मंडळी बाहेरगावी गेल्यास १४ दिवस त्यांनी होम क्वारंटाईन होणे बंधनकारक असल्याचे म्हटले होते. शिवाय दुसऱ्या गावातील भजन मंडळ व नाच मंडळ यांना गावामध्ये येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे यावर्षी जाखडी नृत्य व जाखडी नृत्यांचे डबलबारीचे सामनेही गणेशोत्सवात होणार नसल्याचे दिसते. याचा परिणाम जाखडी नृत्याच्या मानधनावर होणार असल्याने या वर्षी जाखडी नृत्य करणाऱ्या नाच मंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय जाखडी प्रेमींना याचा आस्वाद घेणे शक्य नसणार आहे.जाखडी नृत्य व डबलबारी सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा