विक्रोळी येथील १४० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ' शुश्रुषा सुमन रमेश तुलसियानी हॉस्पिटलचा रुग्णांकडून आभार व कौतुक


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) शुश्रुषा हॉस्पिटल, दादर गेली ५२ वर्ष सेवा देत आहे. विक्रोळी येथे दुसरी शाखा १४० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ' शुश्रुषा सुमन रमेश तुलसियानी हॉस्पिटल ' नावाने गेली दोन वर्षे कार्यरत आहे. सध्या 'कोविड १९' साठी मुंबई महानगर पालिकेकडे असून पालिकेच्या नियमानुसार रुग्णांची सेवा चालू आहे. आता पर्यंत जवळपास ८०० रुग्ण दाखल होऊन चांगले होऊन घरी गेले आहेत. सर्व रुग्णांनी हॉस्पिटलच्या  मिळालेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल प्रशंसा केली आहे. त्यापैकी एका(सौ.भाविका भारत बांदेकर) रुग्णाने हाँस्पीटलला पत्र पाठवून आभार व कौतुक व्यक्त केले आहे.

टिप्पण्या