समीर खाडिलकर यांनी दिला जेष्ठ नागरिक व पत्रकारांना मदतीचा हात
मुंबई(शांत्ताराम गुडेकर) कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता समीर खाडिलकरही याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. २३ आँगस्ट २०२० रोजी ईशान्य मुंबईतील ३० जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार,मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना अन्नधान्य किटचे वाटप(वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले.२१०००/- चे अन्नधान्य वाटप त्यांच्या सहकार्याने करण्यात आले.त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत खार पूर्व येथील "श्री स्वामी समर्थ " कृपासिंधू सामाजिक संस्था(नोंदणीकृत)अध्यक्ष सुनिल मांजरेकर,सल्लागार रविंद्र आंब्रे यांनी समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे.तसेच भा.म.सेना राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे(संपादक- शिववृत्त),महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड.आनंदजी गुगळे यांनी " कोविड योध्दा" या सन्मानपत्राने गौरविले.तसेच साप्ता.धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,पाक्षिक आदर्श वार्ताहर संपादक पंकजकुमार पाटील यांच्यासह विविध संस्था,संघटनाव वर्तमानपत्र यांनीही समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्रने गौरव केला आहे. समीर खाडिलकर यांना कोविड योध्दा सन्मानपत्र प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.शिवाय आज गरजवंत जेष्ठ नागरिक व जेष्ठ पत्रकारांना अन्नधान्य किटचे वाटप केल्याबद्दल अनेकांनी समीर खाडिलकर यांचे कौतुक करत त्यांना गणेशोत्सवनिमिताने शुभेच्छा व आशिर्वाद दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा