लांजा - पावस रोडला भीषण अपघात , एक ठार , एक गंभीर जखमी
लांजा (दीपक मांडवकर )लांजा पावस रोडला चांदोर फाटा येथील वळणावर मोटारसायकलला भीषण अपघात झाला , या अपघातामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी झाला , सदर मोटारसाकलस्वार पावस वरून गवाणेच्या दिशेने जात असता मोटार सायकल वरील ताबा सुटून गंभीर अपघात झाला . या अपघातामध्ये सचिन रा. गुरव रा. गवाणे आणि रुपेश पा. गुरव हे गंभीर जखमी झाले , अपघात झाल्यानंतर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी दोन्हीही गंभीर जखमींना सापुतळे ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवले , तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ कामत यांनी तपासणी करून जिजाऊ संस्थेच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथे पाठवत असताना रस्त्यामध्ये सचिन गुरव याच निधन झालं , सदर अपघाताच्या ठिकाणी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी अपघात ठिकाणी गतिरोधक बसवण्याची वारंवार मागणी करून सुद्धा बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे , अजुन किती बळी गेल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येईल असा संतप्त सवाल तेथील स्थानिक ग्रामस्थ करत आहेत , या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले असून किती तरी लोकांचा मृत्यू झाला आहे , अपघाता प्रसंगी मदत करण्यासाठी चांदोरचे विद्यमान सरपंच पद्माकर कोकरे , पोलीस पाटील प्रवीण मेस्त्री , वाडीलिंबुचे पोलीस पाटील लोटणकर , रामचंद्र कोकरे , समीर कोकरे , शंकर कोकरे आदी उपस्थित होते . वाघ्रट वाडीलिंबुचे सरपंच देवेंद्र लोटणकर यांनी जिजाऊ संस्थेची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा