नवशी फाटा ते शिरशिंगे रत्यावर खड्ड्यांचे साम्राज्य,रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसे करणार आंदोलन
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली यांना निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते
दापोली (चिन्मय देवरुखकर) जिल्हा परिषद अंतर्गत येणारा नवशी फाटा ते शिरशिंगे फाटा या रस्त्यावर खड्यांच साम्राज्य पसरले आहे;सदर रस्ता नागरिकांसाठी अडचणींचा ठरत आहे हे लक्षात घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची भेट घेऊन खड्डे न बुजवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री. वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर सामाजिक उपक्रम राबवून अनोखं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
या प्रसंगी निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष श्री नितीनजी साठे , मनविसेचे जिल्हाध्यक्ष श्री सचिनजी गायकवाड , उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरिवले , राजेंद्रजी वाडकर, मनसेचे तालुका सचिव मयुरजी काते, मनविसेचे तालुकाध्यक्ष कु.साईराज देसाई , वाहतूक सेनेचे अरविंदजी पुसाळकर ,मनविसेचे माजी तालुकाध्यक्ष अल्पेशजी भुवड, मनविसेचे माजी सचिव अमोलजी काते हे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा