राजमुद्रा प्रतिष्ठान आणि चाफेश्वर गणेश उत्सव मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद


मुंबई : मुंबईतील क्रांतीनगर ताडदेव येथील चाफेश्र्वर गणेश उत्सव मंडळ आणि राज मुद्रा प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केले गेले. यावेळेस राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदिपभाऊ साबळे याच्यावतीने रक्तदान करुन येथील बॉम्बे हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि स्टाफंना  भेट वस्तू देण्यात आली, सोबत पोलिस उपनिरीक्षक सचिन माने साहेब (ताडदेव), शेळके साहेब(ताडदेव), बॉम्ब स्कोड चे संदीप शिंदे (साहेब), राज मुद्रा प्रतिष्ठान चे सदस्य मिलिंद, उषा म्हसकर संदीपा गावडे, निलेश म्हात्रे सुनील चाळके, तसेच रोहन अनभूवले जगदीश पुजारी धर्मेश परमार आदी मान्यवर उपस्थित होते.



   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती . राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते . त्याला प्रतिसाद देत चाफेश्र्वर गणेश उत्सव मंडळ आणि राज मुद्रा प्रतिष्ठानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात , गर्दी टाळत अनोख्या रक्तदान शिबिराला सुरूवात केली होती. .



   राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेच्या मान्यतेने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . दहा दिवसांच्या या शिबिरात रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्तदान पार पडले. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगबाबतही विशेष काळजी घेतली गेली. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते. शिवाय , स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदीपभाऊ साबळे यांनी सांगितले .


  राज्यात दररोज साधारण पाच हजार रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते . विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते . कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे . शिवाय , उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबीर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत.त्यामुळे अशा रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमामुळे कोरोनाला हरविण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानचा हातभार लागेल असे श्री संदिपभाऊ साबळे यांनी म्हटले आहे.


टिप्पण्या