मनोरुग्णालय येथील रुग्णाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी (हृषिकेश सावंत)- प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. विवेक सीताराम नागविजकर (५५) असे मृत्यू झालेल्या मनोरुग्णाचे नाव आहे. याबाबत रुग्णालयाचे कर्मचारी नितीन शिवदे यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी विवेक नागविजकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शिवदे यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
जाहीरातः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा