गणेश हिरवे यांनी बजावले ३० व्या वेळी रक्तदानाच कर्तव्य
मुंबई (शांत्ताराम गुडेकर) जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे यांनी सामाजिक जाणिव ठेवून आज रामनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोरेगाव पूर्व आयोजित रक्तदान शिबिरामध्ये वैयक्तिक ३० व्या वेळी रक्तदान करून आपले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. याआधी देखील लॉकडाउन सुरू झाल्याबरोबर त्यांनी मार्च महिन्यात रक्तदान केले होते.वर्षतून किमान तीन ते चार वेळा ते रक्तदान करतातच.सामाजिक भान ठेवून कार्य करणारे समाजसेवक म्हणून त्यांना मुंबई व महाराष्ट्रात सर्वजण ओळखतात.रक्तदान केल्यामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो व एकमेकांबरोबर मारामारी करून रक्त रस्त्यावर सांडून वाया घालविण्यापेक्षा रक्तदान करुन ते एकमेकांच्या नसानसात गेले व त्यामुळे कोणाचा तरी प्राण वाचविण्यासाठी ते उपयोगी पडत असेल तर यापेक्षा अधिक मूल्यवान काहीच नाही व याच धारणेतून हिरवे सर रक्तदान करीत असतात.रक्तदान हे एक पवित्र कार्य असून अनेकांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा जेणेकरून रक्तदान केल्यामुळे एक आत्मविश्वास व वेगळेच समाधान मिळते व आपण सीमेवर जाऊन प्रत्यक्षात लढू शकत नसलो तरी रक्तदान करून एक नवा आदर्श नक्कीच निर्माण करू शकतो.मा शाखाप्रमुख अजित भोगले,मंडळाचे सचिव प्रसाद कदम,सचिन चव्हाण,पत्रकार उदय सांगळे,दत्ताराम सावंत,सूर्यकांत सालम,चेतन सरफरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा