सावधान..नालासोपारा कोरोनाच्या विळख्यात


नालासोपारा  (विनोद चव्हाण) कोरोनासारख्या आपत्तीमुळे वसई विरार महानगर पालिकेच्या परिसरात दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना ग्रस्त रुग्णामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसमुळे वसई विरार महानगर पालिकेच्या परिसरात ७३४४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे, तर १५०  लोकांचा मृत्यू झाला आहे.नाकरीकांतून कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.


जिल्ह्याटाळेबंदी शिथील केल्यानंतर वसई विरार महानगर पालिकेच्या परिसरात कोरोनाचे सावट आणखी गडद झाले आहे. वसई विरार महानगर पालिका परिसरात आत्ता पर्यत ४१९७१  जनाची कोविड १९ चाचणी करण्यात आली आहे. तपास करण्यात आलेल्या व्यक्ती पैकी ७३४४ व्यक्ती कोरोना पोझिटिव्ह असल्याचे अहवाल जाहीर करण्यात आला आहे. २२६३ हे रुग्ण उपचार घेत आहेत, नालासोपारा पूर्वभागात नगीनदासपाडा,  विजयनगर, राधनागर, तुलिंज पोस्ट , मोरेगाव शिवमंदिर परिसरात कोरोनाचे विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत असे प्रभाग समिती प्र. सहाय्यक आयुक्त राठोड साहेब यांनी पत्रक कडून जाहीर केले आहे तसेच सदर विभाग हे काटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी काम व्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आव्हान पालिकाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मानत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


एकीकडे कोरोनाची भीती वाढत्या पावसामुळे पाण्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नाकारता येत नाही. सातत्याने प्रशासन यांच्या कडून सूचना  देऊन हि मोकाट फिरणाऱ्या जनतेवर ताबा मिळवणे आत्ता प्रशासन व पोलिस यंत्रणा समोर आव्हान निर्माण झाले आहे. मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींमुळे नालासोपारा पूर्व भागात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसांन  दिवस वाढत आहे. वसई  मध्ये इंडस्ट्रीज असल्याने बऱ्याच कंपनी अनालॉक मध्ये सुरु झाल्या आहेत त्यामुळे कामगार वर्गाला कामावर उपस्थित राहणे भाग पडत आहे. अनालोक मध्ये हाताला काम नसल्याने घरी बसलेले मजुरांनी जीव मुठीत धरून कामावर जावे लागत आहे. पालिका प्रशासन देखील  कोरोनाचा कहर थोपवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुले जनते मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे


टिप्पण्या