कोरोना काळात गावातील एकाही व्यक्तीबरोबर न फिरलेला आमदार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार कसा? – बाबासाहेब पावसे पाटील


ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडीवरुन महाराष्ट्रभरात गोंधळाची परिस्थिती


मुंबई - महाराष्ट्रभरात मुदत संपलेल्या ग्रामपंचायत मध्ये प्रशासक निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाची योग्य व्यक्तीची व्याख्या काय आहे?  आणि ती ही ठरवणार आमदार आणि पालकमंत्री यांचा हेतु शुध्द काय आहे? .तसेच विद्यमान सरपंच व सदस्य यांची नियुक्ती का होऊ शकत नाही ती व्यक्त योग्य नाही का. असा सरळ सरळ अर्थ होत असून  याबाबत शासनाने स्पष्टीकरण देण्यात यावे अशी मागणी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश चे सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले आहे


  सदरचा निर्णय सरपंचा विरोधी असलेचे सांगून शासनाला अनेक वेळा सांगून सुध्दा याकडे दुर्लक्ष होत. सदरचा शासन निर्णयामध्ये  सरपंच सदस्य यांच्या वितरीक्त व्यक्ती ची निवड  सोडून म्हटले आहे. परंतु योग्य व्यक्ती ठरवणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सरकारने ज्या ज्या ग्रामपंचायतींची कार्यकाल संपला आहे त्या ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड आमदार महोदय यांचे शिफारशीने, पालकमंत्री यांच्यामार्फत गावा गावातील सरपंचांची  नियुक्ती करणार असे कळते ते ठिक आहे. परंतु ती व्यक्ती नियुक्त करताना विद्यमान सरपंच तसेच बाॅडीतील सदस्य यांची नियुक्ती करता येणार नाही ती का करायची नाही? आम्ही योग्य का नाही?


   आम्हाला कोणत्या नियमाचे आधारे अयोग्य ठरविले आहे याचा खुलासा शासनाने दिला पाहिजे.तसेच ज्या सरपंचांनी त्या त्या गावात कोरोना काळात योग्य काम केले आहे त्यांच्या बाबतीतचा निर्णय त्या गावातील जनतेला विचारूनच योग्य व्यक्ती ठरला पाहिजे.जो गांव एकमताने ठरविल ती कुणी ही असो.सध्याच्या परिस्थितीत आमदार साहेब महोदय निवडून आल्या नंतर आज अखेर एकही दिवस महाराष्ट्रभरातून विद्यमान सरपंचांबरोबर काम केले नाही. गावामध्ये जाऊन यावर शासनाने योग्य विचार पुस कधी केली नाही. आणि प्रशासक म्हणून पात्र व्यक्तीचे पात्रता निकष शासनाकडून शासकीय आदेशान्वये जी आर द्वारे जाहीर व्हावे अशी मागणी होत आहे.


टिप्पण्या