इसवली ग्रामपंचायतजवळच असलेला विद्युत पोल कोसळण्यापुर्वी बदला-सुभाष पालकर
पोल कोसळल्यास होऊ शकते मोठे नुकसान
कोकण (शांत्ताराम गुडेकर/केतन भोज) लांजा तालुक्यातील इसवली सुतारवाडी येथील ग्रामपंचायत जवळच असलेला विद्युत पोल जीर्ण झाला असून धोकादायक झाला आहे.महावितरणने या पोलकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान इसवली गावाला सोसावे लागू शकते.तत्पुर्वी सदरचा पोल कोसळण्यापुर्वी तात्काळ बदलावा अशी मागणी येथील प्रतिष्ठीत नागरिक श्री सुभाष पालकर यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्हयातील लांजा तालुक्यापासून सुमारे 67 कि.मी अंतरावर असलेले इसवली गाव सुमारे १०६१.७६ हेक्टरचे आहे.२०११ च्या जनगणनेनुसार २४२ कुटूंबाचे हे गाव असून गावातील सुतारवाडी येथे असलेला एक विद्युत पोल जीर्ण झाला आहे.येथे पुर्ण प्राथमिक शाळा असून हा वाडीचा मुख्य रस्ता आहे.साहजिकच येथे लोकवस्ती आहे.मात्र रहदारीच्या मार्गावर असलेल्या या जीर्ण लाईट पोलकडे महावितरणचे दुर्लक्ष कसे? असा प्रश्न येथील रहिवाशी सुभाष पालकर यांनी महावितरणला केला आहे.
जीर्ण झालेला हा पोल संबंधित विभागाने तात्काळ बदलून संभाव्य होणारा धोका टाळावा.दरम्यान हा जीर्ण पोल कोसळला तर अनेक दिवस येथील विद्युत पुरवठा बंद होईल.परिणामी अनेक समस्यांचा सामना नागरिकांना सहन करावा लागेल.म्हणून हा जीर्ण झालेला पोल त्वरीत बदली करावा अशी मागणी श्री सुभाष पालकर यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा