ठाणे गुन्हे शाखेचे भगवान हिवरेंसह संपूर्ण टीमचा बिहार पोलिसांनी केला गौरव
फाशीची शिक्षा सुनावलेला फरार आरोपीस ठाणे गुन्हे शाखेच्या टीमने केले जेरबंद
ठाणे - ठाणे पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने बिहार मधील कुख्यात फरार आरोपीस अटक करून बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर कार्याबद्दल बिहार पोलिसांनी मारवडच्या ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस भगवान हिवरे यांच्यासह संपूर्ण टीमचा गौरव केला.
मारवड येथील रहिवासी भगवान हिवरे हे सन २००९ पासून पोलिस म्हणून तर गेल्या दीड वर्षापासून ठाणे शहर पोलिसात गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बिहार राज्यातील प्रजितकुमार सिंह नामक आरोपीस तिहेरी हत्याकांड व खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत होता. सदर आरोपीस मृत्युदंड सुनावण्यात आला होता. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्यानंतर तो अर्ज फेटाळून राष्ट्रपतींनी त्याची शिक्षा कायम ठेवली होती. दुसऱ्या एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीने बेटियाह येथून पळ काढला होता. गुप्त माहितीवरून सदर आरोपी ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने इन्स्पेक्टर नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यास अटक करून बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर कार्याबद्दल संपूर्ण टीमचा बिहार पोलिस महाव्यवस्थापक, यांच्याकडून गौरव करण्यात आला. तसेच प्रमाणपत्र, व ५० हजार रुपये रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. सदर बहुमान मिळाल्याबद्दल भगवान हिवरे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात येत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा