साठेबाज रेशनिंग दुकानदाराला 'मनसे दणका' - वाटमारीबाबत मनविसे शिष्टमंडळाने घेतली शिधा अधिकाऱ्यांची भेट


 

जिथे नाही प्रभाव तिथे जनशक्तिचा दबाव..मनसे दणका

 

ठाणे : गोरगरीबांच्या तोंडी जाणारा हक्काचा घास हिरावून घेणार्‍या रेशन दुकानदाराविरोधात महाराष्ट्र सैनिकांनी शड्डू ठोकले आहेत. लोकमान्यनगरच्या मैत्री पार्क येथील रेशनिंग दुकानदाराने सर्वसामान्यांच्या धान्याचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनविसे शिष्टमंडळाने शिधावाटप अधिकार्‍यांची भेट घेतली. दुकानदाराच्या कृत्याचे सबळ पुरावेही यावेळी देण्यात आले असून त्याच्यावर कारवाई न झाल्यास 'मनसे दणका' दिला जाईल असाही इशारा दिला.

 

लोकमान्यनगरच्या मैत्री पार्क येथील रेशनिंग दुकानदाराच्या गैरव्यव्हाराची माहिती महाराष्ट्र सैनिकांना मिळाले होती. याबाबत मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे व शहर अध्यक्ष किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण, ओवळा माजीवडा विभाग सचिव मयूर तळेकर, विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष मंदार पाष्टे, सागर वर्तक, शाखाध्यक्ष संदीप शेळके, निखिल येवले व कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने ३६फ परिमंडळाचे शिधावाटप अधिकारी गायकवाड व सहा. शिधावाटप अधिकारी पटेल यांची भेट घेतली. यावेळी दुकानदारांच्या तक्रारींचा पाढा वाचला आणि दुकानदार धान्यवाटपात जो गैरव्यवहार करत आहे व रेशन कार्ड वरील 'आर सी' नंबर मध्ये देखील फेरफार करत आहे. त्याचे पुरावे अधिकार्‍यांना दिले. यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसैनिकांनी दिला असून गायकवाड यांनी योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन मनविसेच्या शिष्टमंडळाला दिले असे उपशहर अध्यक्ष संदिप चव्हाण यांनी सांगितले.

टिप्पण्या