भारतीय मराठा महासंघातर्फे रोजगार विभागाची स्थापना करणार - जिल्हाध्यक्ष श्री किशोर पवार
रोजगार विभागात काम करण्यासाठी लवकरच पदनियुक्त्या,इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
ठाणे : केवळ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तयार करून बेरोजगारांची संख्या वाढवण्यापेक्षा या विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न भारतीय मराठा महासंघ करणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कंपनीमध्ये रोजगारांच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करुन प्लेसमेंटमधून जास्तीत जास्त बेरोजगार,विद्य़ार्थांना येत्या वर्षात नोकऱ्या मिळवून देण्याचे काम हे विभाग करेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष श्री किशोर पवार यांनी व्यक्त केला.
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थी नोकरीच्या शोधात असतात. मात्र भारतीय मराठा महासंघ हे केवळ न्याय देणारे ठिकाण न बनता करिअरची संधी देणारे केंद्र बनावे यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे उद्धीष्ट आहे . यामधून अनेक विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरील रोजगारासह देश-विदेशात नोकरीची संधी मिळणार आहे. अनेक पदव्युत्तर विद्यार्थी विविध देशात रिसर्च प्रोफेसर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट व पीएचडी करत आहेत.
सुरवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रभर विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.या पदाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक उपलब्ध कंपन्यामध्ये रिक्त जागा यांची माहीती घेतली जाणार आहे.रिक्त जागा असल्यास जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींना या माध्यमातून रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.यासाठी प्रत्येक जिल्हा,तालुका स्तरावर हे काम करण्याचे उद्धीष्ट भारतीय मराठा महासंघातर्फे ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत.त्यामुळे बेरोजगारीही वाढली आहे.अशा काळात प्रत्येकाला तात्काळ काम मिळेलच याची शाश्वती मिळेलच असे नाही.त्यामुळे उपलब्ध ठिकाणी बेरोजगारांना त्वरीत काम मिळवून देण्यास मदत मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या युवकांना जिल्हा उद्योजक केंद्रातून विविध व्यवसायाचे मार्गदर्शन करुन उद्योगांची स्थापना करुन देणे,आर्थिक सहाय्यास मदत करणे,रोजगार मेळावे भरणे याकामासाठी विविध जिल्हास्तर,तालुकास्तरावर रोजगार विभागासाठी पदनियुक्त्या करावयाच्या असून इच्छुकांनी त्वरील या 9769320671 क्रमांकावर किंवा राष्ट्रीय अध्यक्ष श्री आप्पासाहेब आहेर, प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके, राष्ट्रीय सरचिटणीस श्री राम शिंदे, राष्ट्रीय सचिव श्री राजेंद्र जगदाळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री पी.जी.पवार, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा