जावडे हायस्कूलची विद्यार्थीनी कु.प्रिया शाहू ठिक हिने मिळविले 91.20 टक्के गुण,मान्यवरांकडून कौतुक


जावडे हायस्कूलमधून पहिली....


लांजा ( प्रतिनिधी ) लांजा तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथील कु.प्रिया शाहू ठिक या विद्यार्थीनीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत 91.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.कु.प्रिया शाहू ठिक जावडे हायस्कूल येथील आश्रम शाळेची विद्यार्थींनी आहे.


  नेहमी अभ्यासात हुशार आणि जिद्द, चिकाटी मनात धरुन तिने हे शिखर पर्वत गाठले आहे.तिच्याशी आम्ही संवाद साधला असता आईवडील शेतकरी कुटूंबातील आहेत. प्रिया ठिक हीने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल शिवसेना रत्नागिरी-लांजा संपर्कप्रमुख श्री जगदीश जुलूम, नवीमुंबईचे महापौर श्री अविनाश लाड,कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष श्री संतोष माटल,सचिव संदिप पडये यांनी तिला अनेक शुभेच्छाशिर्वाद दिले असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करून, पुढील शैक्षणिक वाटचालीस अनेक सदिच्छा दिल्या आहेत.


  यावेळी सा.जनशक्तीचा दबाव वृत्तपत्राशी बोलतांना प्रिया हिने आपल्या यशाचे श्रेय आपले मुख्याध्यापक संदेश कांबळेसर,शिक्षवृंद यांना दिले.  मी घेतलेल्या कष्टाचं फळ मला मिळालेलं असलं तरी, माझ्या शिक्षकांचा माझ्या यशात सिंहाचा वाटा असल्याचं हिने  प्रांजळपणे कबूल केले. कुटुंबाचे प्रोत्साहन आणि समाजातील प्रत्येकाकडून मिळालेली सकारात्मकता हेच माझ्या यशाचे खरे गमक असल्याचेही तिने यावेळी बोलतांना स्पष्ट केले.


  इसवली पाथरवाडीतील अन्य विद्यार्थांचेही मोठे कौतुक करण्यात येत आहे.यामध्ये सुयश संपादन केलेल्या शुभम शशिकांत पडीयार (74 टक्के),करण अनिल राजे (58 टक्के),श्वेता अविनाश ठिक (67 टक्के),प्रणित ठिक (64 टक्के),अनिकेत पडियार (72 टक्के),प्रार्थना नरसळे (66टक्के) यांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.या सर्वांना पंचक्रोशीतील,गावातील ग्रामस्थ यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पण्या