ठाण्यात मोफत आरोग्य शिबीर आणि औषधांचे वाटप,200 जणांनी घेतला लाभ


ठाणे (प्रतिनिधी) कोरोना महासंकटाच्या काळात सामान्य आजार असलेल्या व्यक्तींना मोफत तपासणी तसेच सर्दी,खोकला अन्य आजारांवर उपाययोजना म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.


कोरोनाचा संकट परिस्थितीत रहिवाशांचे आरोग्य सुलभ राहावे यासाठी राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांत जाधव आणि भाजपा वागळे मंडळ महिला सचिव सौ.पुजा गन्द्रे  यांनी ठाण्यातील वाल्मिकी समाज हाल येथे मोफत आरोग्य शिबिर व औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी या शिबीराचा 200 रुग्णांनी लाभ घेतला.


आमदार श्री संजयजी केळकर तसेच अध्यक्ष आमदार श्री निरंजनजी डावखरे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने आणि तोंडावर मास्क लावून योग्य ती काळजी घेवून रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.


टिप्पण्या