भारतीय मराठा महासंघातर्फे विविध पोलीस स्टेशनमध्ये 1500 इम्युनिटी बुस्टर ड्रिंकचे वाटप


ठाणे (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या सुरक्षेसाठी कायम सतर्क राहणाऱ्या पोलीस बांधवांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी भारतीय मराठा महासंघ व जगत फार्मा यांच्या मदतीने ठाण्यातील विविध पोलीस स्टेशनांमध्ये 1500 इम्युनिटी ड्रिंक बुस्टरचे वाटप करण्यात आले आहे.


इम्युनिटी बुस्टर ड्रिंक हे सुपर अॅंटीआक्सिडंट इम्यून आणि माइंड बूस्टर एक टेट्रा पॅक आधारित अॅसेप्टिक पॅकेजिंग उत्पादन आहे.आंॅक्सिडेटिव्ह तणाव,माणसिक तणाव आणि संसर्ग होण्यापासून हे ड्रिंक काम करते.जनतेची सेवा करताना पोलीस बांधव नेहमीच विविध कारणांमुळे माणसिक तणावाखाली असतात.कोरोनाच्या संकटामुळे तर त्यांच्यावर अतिभार पहायला मिळतो.म्हणून भारतीय मराठा महासंघ आणि जगत फार्मा यांच्या सहकार्यांने ठाण्यातील डिसीपी श्री अविनाश अंबोरे साहेब व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरबावडी पोलीस स्टेशन,नौपाडा पोलीस स्टेशन,वर्तकनगर पोलीस स्टेशन,मानपाडा पोलीस स्टेशन,या ठिकाणी पोलीस बांधवाना या औषधाचे वाटप करण्यात आले.


यावेळी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री पी.जी.पवार,जिल्हाध्यक्ष श्री किशोर पवार,ओवळा-माजीवडा विभाग अध्यक्ष श्री सुरेश कदम,जगत फार्माचे मुंबई आरएसएम श्री निखील किसमतराव व त्यांचे प्रतिनिधी वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री निंबाळकर,श्री शिरसागर,श्री गायकवाड,श्रीमती मुठे मॅडम आदी कर्मचारी उपस्थित होता.


टिप्पण्या