कुणबी समाजनेते चंद्रकांत परवडी यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाखाची आर्थिक मदत


लांजा (प्रतिनिधी) कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा या संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी यांचा वाढदिवस नुकताच १ जून २०२० रोजी संस्थेच्या कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून साधेपणाने संपन्न झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड – १९ करीता रु. एक लाख मात्रचा धनादेश लांजा तहसिलदार श्रीम. वनिता पाटील यांचेकडे संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी यांच्या हस्ते देणेत आला.


            यावेळी संस्थेचे संचालक श्री. नंदकुमार आंबेकर हे आदर्श विद्यामंदिर देवधे प्रशालेच्या लिपिक या पदावरून सेवा निवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला. याप्रसंगी लांजा राजापूर - विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजन साळवी उपस्थित राहून श्री. चंद्रकांत परवडी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व श्री. नंदकुमार आंबेकर यांना सेवा निवृत्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 


            राज्यात कोरोना विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून त्या अनुषंगाने शासन स्तरावर विविध घटकांसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या अनेक प्रसंगी आपल्या पतसंस्थेने नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक मदत केलेली असून या प्रसंगी देखील संस्थेने कोविड - १९ चा मुकाबला करण्यासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरीव मदत केली आहे. यापूर्वी देखील संस्थेने तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील स्थलांतरित मजूरांना अन्नधान्याचे किट उपलब्ध करून दिले आहे.


            या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, संचालिका व सभापती श्रीम. लिला घडशी, संचालक श्री. चंद्रकांत धनावडे, श्री. गणेश जोशी, श्री. आत्माराम धुमक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप डाफळे, श्री. संदीपजी दळवी, श्री. सुरेश करंबेळे, श्री. प्रभाकर सनगरे सर, श्री. दिलीप चौगुले, श्री.तुषार परवडी, कर्मचारी श्री. संतोष घडशी, श्री. जयवंत खुलम, श्री. गंगाराम कालकर, श्री. सचिन रामाणे, श्री. सुरेश मसणे, श्री. रितेश खावडकर, श्री. तुकाराम आगरे, श्री. दिपक खावडकर, श्री. महेश बर्वे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक, व उपस्थित सर्व मान्यवर तसेच  तालुक्यातील सर्व स्तरावरून श्री. परवडी साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


टिप्पण्या