सिंधुदुर्गात कॉरंटाईन चाकरमान्यांची व्यवस्था करणार्‍या गाव कृती समितीलाच कॉरंटाईन व्हावे लागले


सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) सिंधुदुर्गात येणार्‍या गावात बाहेरून येणार्‍या व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात येत असून त्याची जबाबदारी प्रशासनाने गाव कृती समितीवर दिली आहे. मात्र कुडाळ तालुक्यातील पडवे गावच्या समितीवर ही व्यवस्था करताना आता समितीलाच कॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. पडवे ग्रामपंचायतीत आणि कृतीदल चांगल्या प्रकारे काम करीत आहेत तर पडवे गावात मुंबईहून आलेल्या एका महिलेला बाजूला रिकाम्या घरात कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते. या महिलेचा पती गावातील ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला त्यामुळे तिचा पतीचा नमुना घेण्यात आल्यानंतर तोही पॉझिटीव्ह आला.  या ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पतीने गावात एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यामुळे त्या कार्यक्रमात सहभागी झालेले सरपंच, ग्रामसेवक व अन्य सदस्य असलेल्या गाव कृती समितीला आता कॉरंटाईन व्हावे लागले आहे.


टिप्पण्या