कोरोना लढ्यात पनोरे गावाचे एक पाऊल पुढे... गरजूंना केली अन्नधान्याची मदत


लांजा (प्रतिनिधी) कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी संपूर्ण देशात  लॉकडाऊन चालू झाल्यापासून अशा काळात सर्व हॉटेल, खानावळ, मोलमजुरी बंद असल्याने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, याच गोष्टीची जाणीव ठेवून गरीब सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी त्यांना दोन वेळचा अन्नाचा घास मिळावा याकरिता पनोरे गावातील ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.शिवसेनेचे लांजा तालुका संपर्क प्रमुख श्री जगदीश गोविंद जुलूम यांच्या मदतीने गावातील जागृत नागरिक श्री विजय घोडेकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गरजू लोकांना अन्नधान्याची मदत करुन सामाजिक भान जपले आहे.


लांजा तालुक्यातील भडे गावानंतर इतर अनेक ग्रामपंचायती मुंबईवरुन आलेल्या चाकरमान्यांची विशेष सुविधा करुन देण्यास पुढाकार घेत आहेत.त्यातच पनोरे गावातील ग्रामस्थांनीही मुंबईवरुन येणाऱ्या चाकरमान्यांना पुरेश धान्य मिळेल याची सोय केली आहे. तसेच दैनंदिन लागणारे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्यामध्ये तेल डाळ साखर गहूआटा, कांदे, बटाटे यांची पॅकिंग करून गरीब गरजू हातावर पोट असणारे कामगार बाहेरगावहून मोलमजुरी करण्यासाठी आलेला शहरातील कामगार विद्यार्थी यांच्याकरिता त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.


संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना आपल्या शहरातील गावातील नारिकांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे या भावनेतून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे समजून ते हि सेवा करत आहेत,गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री जगदिश गोविंद जुलूम यांची साथ लाभत आहे.जगदीश जुलूम यांनी गावातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आर्सेनिक अल्बम30 या आयुर्वेदिक गोळ्याही मोफत पुरवठा करणार आहेत.


यावेळी जगदीश जुलूम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आपले कुटुंब सोडून डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत यांना सर्वांना एक कुटुंब आहे परिवार आहे. या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना आपण नागरिकांनी घरातच राहून साथ देऊन खरी देशसेवा करण्याची वेळ आली आहे. आणि आपण सर्व मिळून ती करूया, आपली आपल्या कुटुंबाची तसेच देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स पाळूया म्हणजे या कोरोनाच्या महामारीच्या संकटातून आपली सर्वांची सुटका होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.


टिप्पण्या