लांजा धावणेवाडी येथे झाड पडून श्री महेश सावंत यांच्या घराचे नुकसान
लांजा (वार्ताहर) आज लांजातील धावणेवाडी येथील नागरिक श्री महेश सावंत यांच्या घराजवळील असलेले मोठे झाड कोसळून गोठा,घराचे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे समजते आहे.सदर घटनेची माहीती मिळताच नगराध्यक्ष श्री मनोहर बाईत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीची पाहणी केली.
तसेच शिवसेना नगरसेविका सौ. वंदना काटगाळकर यांनी सदर घटनेची नगराध्यक्ष मनोहर बाईत, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपनगराध्यक्ष सौ. यामिनी जोईल, पाणी सभापती राजू हळदणकर यांना तात्काळ कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष मनोहर बाईत, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उद्योजक रामचंद्र काटगाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. नगराध्यक्ष मनोहर बाईत त्वरित जे.सी. बी. बोलवून झाड बाजूला करण्यास सुरुवात केली. या भागाचे शिवसेना प्रभाग अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, धावणेवाडी शाखाप्रमुख सुरेश लाड, बुथप्रमुख संकल्प साळुंखे, राजू धावणे, महेश सावंत, अजय सावंत, संतोष लाड, अनिल गुरव, बब्या लाड, पपु काटगाळकर, सुनील शितोळे, प्रसाद साळवी, दिलीप लाड, विशाल सावंत आदी सर्वतोपरी सहकार्य करत होते.तलाठी श्री. पाटील यांनी देखील महसूल विभागाच्या वतीने मोडलेले घर, शौचालय, वाडा आदी नुकसानीची पाहणी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा