शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था कोविड-१९ मध्ये एकत्रित प्रभावी काम जगासमोर नवा आदर्श
रत्नागिरी (विनोद चव्हाण) साऱ्या जगाला कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने ग्रासले असताना या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक पातळयांवर जगभर प्रयत्न सुरु आहेत. शासकीय तसेच खाजगी यंत्रणा, अनेक सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, पोलीस दल, आरोग्य कर्मचारी अशी अनेक उदाहरणे देता येतील कि जे गेली काही महिने या रोगाला हद्दपार करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करीत आहेत. काहींनी तर व्रतस्ताची भूमिका घेवून ते अविरत आणि अथकपणे आपली सेवा बजावत आहेत. या साऱ्यांमध्ये जगभरातील स्वयंसेवी संस्था, त्यांचे कार्यकर्ते देखील कोठेही कमी पडल्याचे दिसत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रभर काम करणारी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेली विकास सहयोग प्रतिष्ठान संस्था कोविड नियंत्रणाच्या कार्यात गेली ३ महिने शासकीय यंत्रणाच्या हातात हात घालून काम करीत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर आपत्ती व्यवस्थापन नियोजन आणि अमलबजावणीच्या कार्यात शासकीय यंत्रणांसोबत काम करीत असताना संवेदनशील शिक्षक, नागरिकांतील पोलीस मित्र, पोलीस खात्यातील कर्मचारी, एन.सी.सी.चे विद्यार्थी यांना सोबत घेवून रत्नागिरी शहरा मधील ७०० सोसायटी सर्वे करण्यात आला. या व्यापक सर्व्हेच्या माध्यमातून सुमारे ४७,००० नागरिकांपर्यत पोहोचून कोरोनाबद्दल व्यापक जागृती करण्यात आली. स्थानिक नागरिकांना लॉकडाऊन मध्ये घरबसल्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू कशा उपलब्द करून देतायेईल यांचे प्लान तयार करण्यासाठी पुढाकार घेनेत आला. नागरिकांबरोबर “संवाद पूल “(communication bridge ) निर्माण व्हावा म्हणून विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात मोठे यश मिळविले असून विकास सहयोग प्रतिष्ठानचे क्षेत्रीय कार्यकर्ते श्री.अजिंक्य हर्डीकर यांनी याकामी स्वतःला झोकून दिले आहे. गेली ३ महिने कोरोना विरोधी लढताना कंटेंटमेंट (प्रतिबंधित क्षेत्र) झोनमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणे, सर्व व्यवस्थांचे समन्वय करणे, NCC विद्यार्थ्यांना सोबत घेवून या साऱ्या कामांना गती देणे यासाठी संस्थेने मोठे काम केल्याचे दिसून येत आहे.
विविध राज्यातून आलेले मजूर लॉकडाऊन मुळे रत्नागिरी मधील विविध ठिकाणी अडकले होते. मुकादम लॉकडाऊन मध्ये सोडून गेल्यामुळे त्या कुटुंबवर उपासमारीची वेळ आली होती, अशा गरीब, निराधार लोकांना food for help च्या माध्यमातून काम करीत असताना या समितीचे कोर कमिटी मेंबर म्हणून विकास सहयोग प्रतिष्ठानचा अनुभव खूपच कामी आला आहे. तसेच निराधार कुटुंबला पुरेसे अन्नधान्य संस्थेच्या माध्येमातून व यंत्रांच्या सहकार्याने उपलब्द करून देण्यात यश आले.
सर्व सामान्यांपासून ते प्रतीतयश लोकांपर्यत जी समज आहे कि सामाजिक संस्था आणि शासन यंत्रणा एकत्रितपणे नीट काम करू शकत नाहीत, त्यांचे जमत नाही आणि जमणार देखील नाही मात्र कोरोना विरोधीच्या या मोठ्या लढाईत विकास सहयोग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हि समज चुकीची ठरविली आहे. म्हणूनच संस्थेच्या कार्याची दखल घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री. प्रवीण मुंढे आणि जिल्हाधिकारी मा. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संस्थेच्या समन्वयाच्या धोरणाची, कार्यप्रणालीची मुक्त कंठाने प्रशंसा केली असून संस्थेचे या मोहिमेतील प्रमुख कार्यकर्ते श्री.अजिंक्य हर्डीकर यांनी “कोविड योद्धा “म्हणून भूषविले आहे. स्वयंसेवी क्षेत्र आणि शासकीय यंत्रणा यांनी एकमेकांना समजून उमजून काम केले तर अवघडातील अवघड काम सोपे होवून जाते हेच या निमित्ताने अधोरेखित झाले असून जगासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम या निमित्ताने संस्थेने केले आहे.
कोरोना विरोधीच्या लढाईमध्ये मनमोकळेपणाने काम करता यावे म्हणून विकास सहयोग प्रतिष्ठानने आपल्या कार्यकर्त्यांना जे बळ दिले त्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना यावेळी या मोहिमेचे प्रमुख श्री.अजिंक्य हर्डीकर यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा