राज्यातील सरपंचांना मिळणार ५० लाखांचे विमा कवच, बाबासाहेब पावसे पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांचे मानले आभार


अहमदनगर दि: २ - २९ मे च्या शासन निर्णयामध्ये राज्यातील सरपंचांच्या विमाकवचाबद्दल  सर्व सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनदरबारी प्रशासकीय . लक्ष्मणराव सरवदे  अमोल शेवाळे यांच्या सहकार्याने पाठपुरावा करून सरपंच सेवा संघाच्या सर्वश्री रविंद्र पवार भाऊ मरगळे, सौ भाग्यश्री नरवडे ,पंकज चव्हाण, शंकर पाटील खेमनर नवनाथ शिंदे, अँड भाऊसाहेब गुंजाळ, रवि गाटे ,गणेश तायडे ,सरपंच पदाधिकरी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील तमाम आजी माजी सरपंच,आजी माजी उपसरपंच राज्यातील सरपंचांना ५० लाख रुपयाचा विमा देण्यात यावा अशी मागणी इमेल द्वारा  पत्राद्वारे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,दादा पवार,ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब  यांच्याकडे केली होती याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत याबद्दल मागणी केली.


  या विमा कवचाचा फायदा राज्यातील २७५०० सरपंचांना मिळणार आहे. प्रत्येक गावातील सरपंचां चा ५० लाख रुपयांचा विमा या माध्यमातून निघणार आहे.  ग्रामीण भागामध्ये सरपंच हे सध्याच्या कोरोना च्या लढाईत अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. ते आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे आज श्री. सामंत म्हणाले.


श्री. सामंत म्हणाले, सरपंचांच्या विमाकवचाबद्दल मुख्य सचिव अजोय मेहता हे राज्य सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश देणार आहे,त्यामुळे सरपंच सेवा संघ,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब पावसेपाटील यांनी आभार मानले आहेत.


टिप्पण्या