जिल्हामधील कोरोना आटोक्यात आणन्याबाबतचे नियोजन व निर्णयाचे ताळमेळ नसल्याने जनतेत संभ्रम
लांजा राजापुरातील अनेक प्रवाशी खेडमध्ये अडकून पडले
मुंबई (विनोद चव्हाण) – कामानिमित्ताने मुंबई मध्ये वास्तव्य करण्याऱ्या रत्नागिरीमधील व्यक्तींना स्वगृही परतण्यास मंजुरीबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय प्रकाशित केला आणि मुंबई मधील अडकलेल्या जनतेचा सुटकेचा श्वास घेतला. स्वगृही प्रयत्नाबाबत दोन दिवस ऑनलाईन व ऑफलाईन सरकारने तयार केलेली प्रक्रिया पूर्ण करून कोकणी माणूस एकदाचा गावी निघाला! मागिल ४५ दिवस १० बाय १० च्या मायानगरीच्या पिंजऱ्यात अडकलेला पक्षी! निर्णयाचा तत्तोतंत पाळणा करीत काही कोकणातील व्यक्ती गावी निघाल्या परंतू ती लोकगावी पोहचलेच नाहीत. त्यांना खेड येथे गाडी थांबून त्यांना जनतेच्या सुरक्षेचा दृष्टीने त्यांना सिव्हीलकोरोनटाइन करण्यात आले.
राजापूर एक कोरोनाग्रस्त रुग्ण जेव्हा जिल्हामध्ये सापडला त्यावेळी पोलिस, डॉक्टर, प्रशासन हे तिन्ही यंत्रण व महाराष्ट्र सरकारसह खडकण जागे झाले. कोविड १९ ला रोखण्यासाठी गंभीर पावले उचलली.जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू केली आणि जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणन्याचा प्रयत्न सुरु झाला.१६ लाख १५ हजार लोकसंख्या असलेला जिल्ह्यामध्ये फक्त १६ वेटिलेच्या जोरावर संपूर्ण जिल्हा ओरेजझोन करण्यास यशप्राप्त झाले
जिल्हामधील कोरोना आटोक्यात अनन्याबाबतचे नियोजन व निर्णयाचे ताळमेळ नसल्याने जनतेत असंतोष प्रसारला आहे. जनता, संस्था संघटनांनी कोविरोना तपासणी बाबत सेंटर रत्नागिरी येथे उभारण्यात यावे या बाबत मागणी करूनही लोकप्रतिनिधी व सरकार यांनी कानाडोळा केला. दिवसान दिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने रुग्ण संख्या हि जलदगतीने वाढत आहे. म्हणून सरकारने नियम शिथिल करून तिसर लॉकडाऊन महाराष्ट्र मध्ये सुरु केले. दारूची दुकाने सुरू करणे म्हणजे लोकांना रस्त्यावर येण्याचे आमंत्रण देणे असे होत. जिल्ह्यात कलम १४४ धाब्यावर बसवून एकत्र येण्यास परवानगी देत आली नियोजांचा व निर्णयाचा अभाव असल्याने तिसरा लॉकडाऊन चा फज्जा उडाला! यंत्रणाच्या निर्णय प्रक्रियेवर जनतेकडून नाराजी व्यक्त केली जाता आहे. जनते कडून स्थानिक प्रशासन व सरकार यांना विनंती केली जाता आहे. सुरक्षेचा दृष्टीने प्रक्रिया पूर्ण कराच परंतु मुंबई व दुसऱ्या जिल्ह्यातून रत्नागिरी येणाऱ्या व्यक्तीची राहण्याची सुनियोजित व सुरक्षित व्यवस्था (उदा. नियोजित जागा, पाणी व्यवस्था, व्यवस्था व महिला करिता स्वच्छ प्रसादानगृह, लहान मुलांच्या जेवणाची, जमवा प्रमाणात पूरक पोलिस सुरक्षा रक्षक, डॉक्टर व सहायक स्टाफ) असावी असे वाटते. सरकारने जिल्ह्यामध्ये घेण्याचा निर्णय काढला मात्र प्रक्रिया पूर्ण करून हि क्वारंटाईन केली जात आहे.
अवघ्या काही दिवसात कोकणातल्या प्रत्येक गावात एक मुंबई वसेल! मात्र क्वारंटाईन मुळे मुंबई कर भयभीत! स्थानिक प्रशासने गावागावातल्या शाळा, शहरातली महाविद्यालये, लॉजिंग, सरकारी विश्रामगृहे, खाजगी नर्सिंग होम्स, बंद असलेल्या सरकारी कार्यलयांच्या इमारती वगैरे ठिकाणी आणि मिळेल तिथे हजारोंच्या संख्येने मुंबईतून येणाऱ्यांसाठी व्यवस्था (आंघोळ, नाश्ता जेवण पिण्याचं पाणी) करण्याची गरज आहे. मुंबईत ४५ दिवस १० बाय १० च्या खुराड्यात राहून जी काळजी घेतली तशीच गावी गेल्यानंतर ती काळजी घेतली जाईल. “कोरोना म्हणजे मृत्यू हे भय” लोकांच्या खास करून ग्रामीण भागातील माणसाच्या मनातून काढून टाकल पाहिजे. योग्य काळजी व सोशन डिस्टसिंग राखून नियंत्रण राखता येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा