दिव्यात हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींच्या मुंब्रा पोलीसांनी मुसक्या आवळल्या


दिव्यात हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींच्या मुंब्रा पोलीसांनी मुसक्या आवळल्या


ठाणे (प्रतिनिधी) मी डोंबिवलीचा ओरिजनल भाई आहे...फेसबुकवरचा भाई नाही हे तुला दाखविण्यासाठी मी इथे आलो असून तुला आज येथेच ठोकतो असे धमकावून आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलाने फिर्यादी दिनेश मुंढे यांच्यावर राऊंड फायर करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींच्या मुंब्रा पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.त्यांच्यावर भा.द.वि.कलम 307,507,34 सह आर्म अक्ट 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


२४ मार्च रोजी रात्री ९ वाजता डोंबिवलीचे ओरिजनल भाई म्हणून बतावणी करणाऱ्या अक्षय पाटील व त्याचा साथीदार दिपेश यांनी फिर्यादी दिनेश काळुराम मुंढे यांना दिव्यातील आगासन येथील ठिकाणी दारु पिण्याचे निमत्रंण दिले.या ठिकाणी आले असता अक्षय पाटील या आरोपीने मी डोंबिवलीचा ओरिजनल भाई आहे...फेसबुकवरचा भाई नाही हे तुला दाखविण्यासाठी मी इथे आलो असून तुला आज येथेच ठोकतो असे धमकावून आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलाने मुंढे यांच्यावर तीन राऊंड फायरिंग केले.मात्र चुकून अक्षय पाटील याच्या हातातील पिस्तुल मुंढे यांनी हिसकावल्याने हत्येचा प्रयत्न फसला.पिस्तुलाचा आवाज आल्याने आजूबाजूला असलेले लोकं जागी झाली.लोक जमा होत असल्याचे पाहताच अक्षय पाटील आणि त्याचा मित्र दिपेश यांनी पलायन केले.मात्र ते येवढ्यावरच न थांबता पुन्हा मुंढे याला फोन करुन तु आज वाचला ,मी तुला जीवंत सोडणार नाही असे फोनवरुन धमकावले.


याबाबत दिनेश मुंढे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येताच कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनिल घोसाळकर,मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री कन्हैया थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.गुन्हाचे आरोपींनी पकडण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले.या पथकातील पोलीस उपनिरिक्षक श्री संजय गळवे यांना गुप्त माहीतीदारामार्फत आरोपींचा ठावठिकाणा लागला होता.सदरची खबर कळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री मंगशे शिंदे,श्री हनमंत क्षीरसागर,पोलीस उपनिरिक्षक सचिन सरडे,पोलीस हवालदार रमेश माळी,रवी जाधव,श्री धनंजय घोडके,श्री तुषार पाटील,श्री कमलाकर भोये,श्री भुषण खैरनार,शैलेश भोसले आदी पथकाने ठाण्यातील घोडबंदर येथील काशिनाथ नाट्यगृह येथील लपून बसलेल्या अक्षय पाटील व साथीदार दिपेश उर्फ मामा यास ताब्यात घेवून अटक केली.


  सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर,पोलीस सह आयुक्त श्री अनिल कुंभारे,अप्पल पोलीस आयुक्त श्री सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


टिप्पण्या