तरुणांनी नोकरीसाठी आता मुंबईचा नाद सोडा, गावातच उद्योग व्यवसायाकडे वळा- श्री ऋषिनाथ दादा पत्याणे
रत्नागिरी (दिपक मांडवकर) सद्याची स्थिती पाहता नोकरी मिळणे तरुणांना कठीण होऊन बसणार आहे.कोकणासारख्या भागात आज कोरोनामुळे कंटाळून अनेक प्ररप्रांतिय आपला व्यवसाय सोडून गेले आहेत.एवढे असंख्य परप्रांतिय कोकणात व्यवसाय करु शकतात तर इथला स्थानिक भुमिपुत्र मुंबईतील नोकरीवर का अवलंबून राहत आहेत.?म्हणूनआपल्या शिक्षणाचा फायदा व्यवसायवृद्धीसाठी करा आणि आता मागेपुढे न पाहता गावातच उद्याेगव्यवसाय सुरु करण्यास सुरवात करा असे आवाहन श्री ऋषीनाथदादा पत्याणे यांनी तरुणांना आवाहन केले आहे.कोकणातील तरुन मुंबईत राहूनही त्यांच्या जीवनात कोणताही बदल होत नाही हे पाहून पत्याणे यांनी चिंता व्यक्त केली आहे.या तरुणांना जीवनभर नोकरीत अडकून निराषाच भोगावी लागत असल्याचे म्हटले आहे.
निसर्गाने भरभरून दिलेल्या या कोकणामध्ये पोल्ट्री व्यवसाय , दुग्ध डेअरी व्यवसाय, नर्सरी, काजू फॅक्टरी, आंबा कॅनिंग , मत्स्य व्यवसाय असे अनेक उद्योग करण्यासारखे आहेत. फक्त आपली मेहनत करण्याची तयारी आणि सुयोग्य नियोजन आपल्याकडे असले पाहिजे. आज कोणताही कोकणामध्ये व्यवसाय करायचा म्हटला तर त्यासाठी बँका तुम्हाला अर्थसहाय्य देण्यासाठी तयार असतात. आज जर आपण खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसाय चालू केले तर येथील युवकांना येथेच रोजगार उपलब्ध होईल. आज कोकणामध्ये येऊन परप्रांतीय मिळेल तो उद्योग व्यवसाय करून त्यांच्या राज्यात परत जात आहेत तरी याचा गांभीर्याने विचार तरुणांनी केला पाहिजे. लांजा तालुक्यातील नितीश पत्याणें सारखा तरुण युवक दूध डेअरी आणि नर्सरी सारख्या व्यवसायामध्ये आपल करीयर करू शकतो, तर आपल्याला शक्य का नाही? जिल्ह्यातील तरुणांना प्रत्येक क्षेत्रातले मार्गदर्शक आणून एक कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय श्री ऋषिनाथ दादा पत्याणे यांनी बोलून दाखवल आहे. त्या साठी लागणारे मार्गदर्शन सुद्धा वेळो वेळी आपण करू व दर वर्षी स्वयंरोजगार, व्यवसाय प्रख्यात व्यवसायिकांचे मार्गदर्शन शिबिर राबवून जिल्ह्यातील व लांजा तालुक्यातील तरुणांना आपण सहकार्य करू असे संबोधून मोलाचे कार्य करण्याची तयारी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. ऋषीनाथ दादा पत्याणे यांनी दाखवली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा