रत्नागिरी जिल्ह्यात ९५ टक्के लोकांमध्ये कोरोनाबाधित लक्षणे नसले तरी नागरिकांनी शिस्त पाळावी – जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा
जिल्हात ९५ टक्के लोकांमध्ये कोरोनाबाधित लक्षणे नसले तरी नागरिकांनी शिस्त पाळावी – जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा
रत्नागिरी (प्रतिनिधी) जिल्ह्यात असलेल्या कोरोनाबाधितांपैकी 30 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे.ते आता बरे झाले आहेत.यामध्ये मुंबईहून गावी आलेल्यांचा जास्त समावेश आहे.यातील 95 टक्के बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.म्हणजेच हे लोक कोरोनाचा संसर्ग वाढवू शकत नाही.त्यामुळे ग्राम तसेच नागरी कृतीदलांना क्वारंटाईन असलेल्या लोकांशी आदराने वागा असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायन मिश्रा यांनी केले आहे.
त्यांनी जिल्हातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि चाकरमन्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून एक क्लिप जारी केली आहे.या व्हिडीओमधून त्यांनी जिल्हावाशियांना आवाहन केले आहे.आरोग्यसेविका,आशा वर्कर्स अहोरात्र काम करीत आहेत.गावोगावचे काम सुरु असताना तसेच शहरातही काही ठिकाणी वाईट वागणुक मिळत आहे.या लोकांना कोणी त्रास देता कामा नये.तसा प्रकार घडल्यास सबंधितांवर कडक कारवाई करु,असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.गावी आलेल्या चाकरमान्यांचे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.या लोकांना मिळणाऱ्या वागणुकीचाही चिंतेचा विषय ठरला आहे.
या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना आवाहन केले आहे की,काहीही लक्षणे नसणारे ९५ टक्के रुग्ण आहेत.त्यामुळे ते रोगाचा संसर्ग करु शकत नाहीत.ही एक दिलासादायक बाब आहे.सर्व नागरिकांनी शिस्त पाळावी,शासनाचे धोरण पाळावे,क्वारंटाइन केलेल्यांनी बाहेर पडू नये, असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा