दारुची बेकायदेशीररित्या वाहतुक करणाऱ्या इसमांवर कासारवडवली पोलीसांची कारवाई

१३,९९० रुपये किमतीचा माल जप्त


ठाणे (प्रतिनिधी) वाईनशाप मालकांना दारुचे आनलाईन विक्री करण्याचे तसेच घरपोच विक्री करण्याचे शासनाने आदेश दिलेले असताना ठाण्यातील तिघा इसमांनी आदेशाचे उल्लंघन करीत आफलाईन दारुची विक्री करताना वाहनासकट दिसून आले आहेत. सदरचा प्रकार बेकायदेशीर असल्याने दारू विक्री करणाऱ्या तीन इसमांवर कासारवडवली पोलीसांनी कारवाई करत त्यांचे ताब्यातून ५७ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.


कासारवडवली पोलीस स्टेशनची कारवाई कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पोलीस आयुक्त सो.ठाणे शहर यांनी वेळो वेळी मनाई आदेश निर्गमीत केलेले आहेत.सदर आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे या करिता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवून याबाबत योग्य कारवाई करणे बाबत आदेशीत करण्यात आलेले आहे.तसेच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वाईन शॉप मालकांना Online दारू घरपोच देवून विक्री करणे बाबत योग्य त्या सूचना देवून त्याचे तंतोतंत पालन करून दारू विक्री करणे बाबत आदेश दिलेले आहेत.


मात्र कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीतील कासारवडवली नाका येथील अनमोल वाईन शॉप चे बाजुस सदर शॉप मध्ये काम करणारे कामगार हे तेथे काम करित असलेल्या Manager नामे सुदीप ब्रीजनारायण सिंग याचेशी सेटींग करून on Line दारू विक्री न करता बेकायदेशीररित्या दारू विक्री करित असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. कासारवडली पोलिसांनी खात्री केली असता तेथे अनमोल वाईन शॉप मध्ये काम करणारे कामगार नामे १) रॉबिन्सन बाप्स्तीत डिसोजा, वय२३ वर्षे,धंदा-नोकरी (अनमोल वाईन शॉप)राह-कासारवडवली २) अविनाश किसन सिंग, वय२३ वर्षे धंदा-नोकरी (अनमोल वाईन शॉप) हे शॉपच्या बाजूस बेकायदेशीररित्या दारू विकत असल्याचे दिसून आले. त्यांच्या ताब्यातून Signature Premium,DSP Black,Kingfisher Strong इत्यादी प्रकारच्या दारूच्या ५७ बाटल्या व २३०० रोख रक्कम असा एकूण १३,९९० रुपये किमतीचा माल मिळून आल्याने वरील ३ आरोपीत यांचेवर कासारवडवली पोलीस स्टेशन येथे ग.र. क्र. १२९/२०२० महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) सह भा.द.वि. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


   सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर,सह पोलीस आयुक्त.श्री.सुरेश कुमार मेकला,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे श्री.अनिल कंभारे,मा.पोलीस उपायुक्त,परि-५ श्री.अविनाश अंबरे,मा.सहायक पोलीस आयुक्त,वर्तक नगर विभाग श्री.पंकज शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, स.पो.नि सागर जाधव,पोलीस हवा/५०४७ एस बी.खरात,आर.एस चौधरी/३४३२,पो.ना १७८ आर.एस महापरे,पो.ना.ताडे/१२६३ ,यांनी केलेली असून पुढील कारवाई करित आहोत.


 


टिप्पण्या