अविनाश लाड यांच्यामुळे दिव्यातील अत्यंत गरजू लांजावाशियांना मिळाले तांदुळ आणि किराणा



अविनाश लाड यांच्यामुळे दिव्यातील अत्यंत गरजू लांजावाशियांना मिळाले तांदुळ आणि किराणा


ठाणे (प्रतिनिधी) कोरोना विषाणु फैलावण्यामुळे राज्यात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी होत आहे.त्यामुळे नागरिकांना ना काम मिळत आहे ना कुठे बाहेर पडायला मिळत आहे. त्यातच लाॅकडाऊनचा काळावधीही वाढल्याने ठाण्यातील दिवा शहरात राहणाऱ्या लांजातील रहिवाशांना आर्थिक परिस्थितीचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे दिवा विभागात राहणाऱ्या काही मजूरदार वर्गातील जनतेसाठी नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड धावून आले असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देत गरजू लांजावाशियांना 100 किलो तांदुळ आणि किराणा वाटप केले आहे.त्यांच्या या मदतीने दिव्यातील कोकण रहिवाशांनी आभार मानले आहेत.

      गेल्या अनेक दिवसांपासून दिव्यासारख्या भागात राहणाऱ्या लांजातील  नागरिकांना घरातील अन्नधान्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.लोकांच्या घरात किराणा संपल्याने जगायचे असे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला होता.दरम्यान हि बाब कार्यसम्राट नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांचे  समर्थक रुपेश कातकर यांनी हि बाब लक्षात आणुन दिली.नागरिकांच्या घरात तांदुळही संपलेत असे कळविल्यानंतर  त्यांनी अशा अत्यंत गरजू नागरिकांना 100 किलो तांदुळ आणि किराणा पाठवून दिला.लाड समर्थक रुपेश कातकर,महेश चांदे,महेंद्र वालम,महेश चंदुरकर,सागर संसारे आदींनी या 30 जणांना  तांदुळ प्रत्येकी 5 किलो आणि काही  जणांना किराणा वाटप करुन सामाजिक भान जपले.अविनाश लाड यांनी कठिण काळात  केलेल्या मदतीमुळे  दिव्यातील दिवावाशियांनी आभार मानले आहेत

टिप्पण्या