कोरोना फैलाव टाळण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची राहण्यासाठी कामाच्या ठिकाणीच,लाॅज,हाॅटेलमध्ये उत्तम सोय करा - मनसे उपविभाग अध्यक्ष प्रशांत गावडे


 

ठाणे (प्रतिनिधी) कोरोनावर विजय मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. अशा वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सलाम...मात्र  त्यांचा उपचार करताना कोरोना विषाणुशी संपर्क येण्याचा सर्वाधिक धोका आहे. हे कर्मचारी २४ तास अशा रुग्णांच्या संपर्कात येत असतात आणि त्यामुळेच कोरोनाच्या विषाणूंचा वाहक ठरू शकतात.नुकतात दिव्यातील घडलेल्या प्रकारानंतर दिवा मनसे उपविभाग अध्यक्ष प्रशांत गावडे यांनी मुख्यमंत्रांना ॲानलाईन निवेदन दिले आहे.अशा कर्मचाऱ्यांना जवळच्याच लाॅज,हाॅटेलमध्ये राहण्याची उत्तम सोय महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी केली आहे.

     महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन जाहीर करून आता महिना उलटून गेला आहे, या महिनाभरात सामान्य जनतेने काही अपवाद सोडता चांगल्या तऱ्हेने सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे लॉक डाऊन पाळाला आहे. पुढेही हे संकट दूर होई पर्यंत लोकं नक्कीच पाळतील यात शंका नाही. पण इतक्या सगळ्या उपयोजना करून देखील राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. त्यामुळे इतकी काळजी घेऊन ही रुग्णांची संख्या का वाढतेय यावर प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

      आज या कोरोनाच्या संकट काळात आपले डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि  हॉस्पिटलचे इतर कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन कोरोनाच्या रुग्णांची देखभाल करत आहेत. हे सर्व करत असताना त्यांचा या कोरोना विषाणूंशी संपर्क येण्याचा सर्वाधिक धोका आहे. हे कर्मचारी २४ तास अशा रुग्णांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळेच हे वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विषाणूंचा वाहक ठरू शकतात. हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर आपल्या घरापर्यंत पोहचण्यासाठी यांना सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करावा लागतो.शक्यतो बेस्ट बस मधूनच यांचा प्रवास होतो. या अशा बसेस मध्ये काही वेळा तुडुंब गर्दी झालेली दिसून येते, अशावेळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून इतरांना कोरोनाच्या संसर्गाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच बरोबर हे कर्मचारी ज्या सोसायटी किंवा विभागांमध्ये राहतात तिथेही त्यांचा इतरांशी थेट संपर्क येण्याची दाट शक्यता असते. या आधीच्या काही केसेस मध्ये अशाच प्रकारे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलेले आहे. हे सर्व वैद्यकीय कर्मचारी हे आमचे हिरो आहेत,पण कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी या आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच जवळपासच्या हॉटेल किंवा लॉज मध्ये राहण्याची सर्वोत्तम सोय महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून द्यायला हवी आणि त्यांच्या खाण्यापिण्याची देखील योग्य सोय महाराष्ट्र सरकारतर्फे केली जायला हवी. तिथल्या तिथे जवळपास या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय झाल्यास या कर्मचाऱ्यांवर येणार प्रवासाचा ताणही कमी होईल आणि जर का नकळत कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होत असेल त्यालाही आळा बसेल असे  श्री प्रशांत गावडे यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.

  दरम्यान कोरोनावर उपचार करणारे कस्तुरबा रुग्णालयातील एक कर्मचारी यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.दिवा ते रुग्णालय असा त्यांच्या बेस्टमधून प्रवास असायचा.गेल्या महिनाभरापासून ते किती जणांच्या संपर्कात आले आहेत.या पार्श्वभुमीवर या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जवळच्या हाॅटेल,लाॅजवर खाण्या पिण्याची सरकारने उत्तम सोय करावी असे मनसे दिवा उपविभाग अध्यक्ष श्री प्रशांत गावडे यांनी म्हटले आहे

टिप्पण्या