नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी लांजा-राजापूर मतदार संघ निर्जंतुकीकरणासाठी पाठविले ४ टन सोडियम हायपोक्लोराईट


 

गावातील घराघरात होणार फवारणी

 

मुंबई ( प्रतिनिधी)  कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर गावातील रहिवाशांना आरोग्याच्या अनेक अडचणींचा सामना  होऊ नये म्हणुन नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी विशेष खबरदारी घेतली  आहे. लांजा-राजापुरात संपुर्ण गावे निर्जंतुकीकरणासाठी त्यांनी ४ टन सोडियम हायपोक्लोराईट नुकतेच  पाठवून दिले आहे.

 

 लांजा-राजापूर मतदार संघातील  प्रत्येक गावाला 15 लिटर सोडियम हायपोक्लोराईट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरांच्या आजूबाजूच्या परिसरात याची फवारणी केली जाणार आहे.भविष्यात गावातील नागरिकांना कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही यासाठी विशेष  प्रयत्न करण्यात येणार आहे.

    आज गावातील प्रत्येक नागरिक  गर्दी न होऊ म्हणुन नियमाचे पालन करीत आहेत. विविध सरकारी यंत्रणा प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करुन कोरोनावर कसे मात करता येईल यासाठी संदेश देऊन सतर्क करीत आहेत. लाॅकडाऊन काळात अनंत अडचणी येत असतात त्यामुळे नागरिकांनी ज्येष्ठ व लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी केले आहे.

     लांजा-राजापूर मतदार संघात बाहेरील व्यकतींना गावात येण्यास सक्त मनाई असुन आतील लोकांना अत्यावश्यक असेल तरच ईन-आऊट करुन बाहेर जाण्यास परवानगी दिली जात आहे. तसेच गाववस्ती अधिकाधिक सुरक्षित रहावी यासाठी  प्रत्येक गावात स्वछताबाबत गावागावात फवारणी करुन साफसफाई करण्याबरोबरच निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.  

     आम्ही जवाबदारी घेतो आपण खबरदारी घ्या हिच विनंती करीत, घरी रहा- सुरक्षीत रहा. असा महत्वाचा संदेश माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी दिला आहे.

टिप्पण्या