रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेली अत्यावश्यक कामे कमी कामगार संख्येत पुर्णत्वास जाणार


 रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी दत्तमंदिरजवळच्या रखडलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून याठिकाणी कार्यरत असलेले शाखा अभियंता संतोष कनावजे, ठेकेदार ओंकार गर्दे आणि कर्मचारी


जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे सार्वजनिक बांधकाम विभागांना आदेश


रत्नागिरी : (प्रतिनिधी) अर्धवट स्थितीत राहिलेली तसेच अत्यावश्यक असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेण्यासाठीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामांना वेगाने सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकामच्या जिल्ह्याच्या दोन्ही विभागात अशा कामांना प्रारंभ झाल्याने रखडलेले रस्ते, पूल, साकव आदी कामे पूर्णत्वास जाणार आहेत.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था ठप्प झाल्याने बांधकाम विभागाची कामे ही अर्धवट स्थितीत रखडली होती. लॉकडाऊनमुळे ही सर्व कामे जैसे थे परिस्थितीत अर्धवट स्थितीत राहिलेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सुरु केलेली परंतु अर्धवट स्थितीत राहिलेली ही कामे तसेच अत्यावश्यक तातडीची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित यंत्रणेने कमीत कमी कामगार वापरून ही कामे पूर्णत्वास नेण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यावतीने अत्यावश्यक सर्व कामे करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून ही कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारी ही सर्व कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत. 


टिप्पण्या