रावारी झरीची वाडी येथील ग्रामस्थांनी मुंबईकरांना वाटल्या जीवनावश्यक वस्तू
लांजा (दिपक मांडवकर) कोरोनाचा महाराष्ट्रात प्रभाव वाडत असताना, त्यात संपूर्ण देश लोकडाऊन असल्याने अन्न धान्याचा सर्वाना तुटवडा पडत आहे. या संकटातून मुंबईकरांना थोडी मदत मिळावी या साठी मुंबईहुन गावी आलेल्या चाकरमान्यांना खायला काहीच नव्हते त्यासाठी रावारी झरीची वाडी येथील ग्रामस्थांनी आपले मदतीचे हात पुढे सरसावले आणि मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
झरीवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर डांबारे, पोलीस पाटील सुरेश आग्रे सह तरुण मंडळी व ग्रामस्थांनी मोठी मदत केली. तसेच पंचायत समिती लांजा. सभापती सौ. लीला घडशी व रावारी बापरे उप सरपंच विलास आग्रे, भोसले वाडीतील ग्रामस्थांनी देखील विषेश सहकार्य मिळाले.
मुंबई येथे अडकलेल्या ग्रामस्थांना गावी पाठवण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांनी विचार करावा अशी विनंती देखील केली आहे. अशी माहिती झरीवाडीतील ग्रामस्थ श्री. रघुनाथ सुर्या मांडवकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा